एक्स्प्लोर

"उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला", महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणावरुन संजय राऊतांची भाजपवर टीका

महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी व्हावी, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटल्याचं दिसतंय, असं म्हणत राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र गिरी महाराज यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी व्हावी, अशी मागणी केलेली आहे. ज्यावेळी महाराष्ट्रातील पालघरमध्ये अशीच काहीशी घटना घडलेली होती, त्यावेळी राज्य सरकारवर मोठा दबाव टाकण्यात आला होता. अशातच आताही या मृत्यूप्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. 

संजय राऊत बोलताना म्हणाले की, "नरेंद्र गिरी महाराज यांच्या मृत्यूचं जे प्रकरण समोर आलं ते अत्यंत रहस्यमय आहे. आत्महत्या जरी म्हणत असाल, तरी त्यांच्या भक्तांनी ती हत्या वाटतेय. त्यामागे कोणतं षड्यंत्र आहे, नक्की काय आहे? याचा तपास होणं गरजेचं आहे. पालघरमध्ये काही साधूंचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला तेव्हा तो हिंदुत्वावर हल्ला असा आवाज भाजपनं देशभरातून उठवला होता. पण नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूंच प्रकरण समोर आलंय त्यातून कुणीतरी उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटलेला दिसत आहे. याची चौकशीसुद्धा सीबीआयकडून व्हावी. तसेच नरेंद्र गिरींच्या भक्तांची देखील मागणी आहे. हा मृत्यू अत्यंत रहस्यमय आहे. ते आत्महत्या करतील असे मला वाटत नाही. याची कारणे शोधायला पाहिजे आणि ते कोणी शोधायची हे ठरवायला हवं. कोणीतरी हिंदुत्वाचा गळा घोटला असंच क्षणभर वाटलं."

महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू; हत्या की आत्महत्या या वादात संपत्तीचा मुद्दा समोर

आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Narendra Giri) यांचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत सापडला होता. महंत नरेंद्र गिरी यांच्या अल्लापूर या येथील बाघंबरी या ठिकाणच्या निवासस्थानी हा मृतदेह सापडला असून पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. त्या ठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी (Anand Giri) याला अटक केली आहे. महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या की हत्या हा वाद सुरु असताना आखाडा परिषदेतील संपत्तीचा वाद समोर आल्याने या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. 

महंत नरेंद्र गिरी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये शिष्य आनंद गिरी हा आपल्याला त्रास देत असल्याचं सांगितलं आहे. तसेच या नोटमध्ये आपला वारस कोण असावा, मठ आणि आश्रममध्ये भविष्यात कशा प्रकारचे काम करण्यात यावं, कशा प्रकारची व्यवस्था असावी या सगळ्याची माहिती दिली आहे. महंत नरेंद्र गिरी यांची सुसाईड नोट ही एक प्रकारचे मृत्यूपत्रच असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

आनंद गिरीचा आरोप

महंत नरेंद्र गिरी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये यापुढे मठाची जबाबदारी कोणाकडे देण्यात यावी हे सविस्तरपणे लिहलं आहे. त्यामध्ये शिष्य आनंद आपल्याला त्रास देत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. त्या आधारे पोलिसांनी आनंद गिरीला अटक केली आहे. पण त्या आधीच आनंद गिरीने माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की, महंत नरेंद्र गिरी यांची ही आत्महत्या नसून ती हत्या आहे. यामध्ये कुणाचा सहभाग आहे याचा खुलासा पोलिसांनी करावा असंही त्यांनी म्हटलं होतं. जर या प्रकरणात आपण दोषी सापडलो तर आपल्याला कायद्याप्रमाणे शिक्षा देण्यात यावी असं आनंद गिरी यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Guardian Ministers List Declair : तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादीHanmantrao Gaikwad Majha Katta| स्कील असो-नसो, परदेशात नोकरी, काम देणारा मराठी माणूस, 'माझा कट्टा'वरJitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोपABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget