एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत आजही उंच लाटा, सतर्कतेचा इशारा
हायटाईडच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांसहित किनाऱ्यावर येणाऱ्या-जाणऱ्यांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. काल यंदाच्या मोसमातील सर्वात उंच लाट मुंबईच्या किनाऱ्यावर धडकली.
मुंबई : मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. आजही मुंबईत उंचच उंच लाटा धडकणार आहे. दुपारी 1 वाजून 49 मिनिटांनी 4.97 मीटर उंचीची लाट किनाऱ्यावर धडकणार आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मुंबईकर मोठी गर्दी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर करू लागले आहेत.
या हायटाईडच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांसहित किनाऱ्यावर येणाऱ्या-जाणऱ्यांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. काल यंदाच्या मोसमातील सर्वात उंच लाट मुंबईच्या किनाऱ्यावर धडकली.
आज मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर मुंबईकर लाटांचा आनंद लुटताना दिसतील. अशा वेळी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस आणि पालिकेकडून खबरदारीची उपाययोजना घेण्यात आली आहे. समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षक तैनात करण्यात आले आहे.
काल 1.02 मिनिटांनी मुंबईच्या किनाऱ्यावर धडकणारी 4.96 मीटर उंचीची सर्वात मोठी लाट धडकली. तसेच आज रविवारी 1.49 मिनिटांनी अशीच 4.97 मीटरची उंच लाट धडकणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी या उसळत्या लाटांचा आनंद नक्की द्यावा पण तो लांबूनच.
शुक्रवारी भरतीमुळे मरिन ड्राइव्हच्या समुद्रातून 9 मॅट्रिक टन कचरा बाहेर आला होता. हा कचरा उचलताना महापालिका कर्मचाऱ्यांचा प्रचंड घामटा निघाला होता.
कोकण किनारपट्टी
कोकण किनारपट्टीवर सध्या समुद्राच्या मोठमोठ्या लाटा उसळत आहेत. रत्नागिरीच्या भाट्ये समुद्र किनाऱ्याचंही या लाटांच्या तडाख्यानं मोठं नुकसान केलंय. वाळूचा चार साडेचार फूट उंचीचा कडाच किनाऱ्यावर निर्माण झालाय . लाटांच्या या तडाख्यात किनाऱ्यावरील अनेक झाडं समुद्राने आपल्या पोटात घेतली आहेत.
सिंहगड किल्ल्यावर जाणारा रस्ता बंद
सिंहगड किल्ल्यावर जाणारा रस्ता पुढचे दहा दिवस बंद राहणार आहे. काल सिंहगड रस्त्यावर दरड कोसळ्याने घाटातला रस्ता बंद करण्यात आला आहे. दुरूस्तीचे काम पूर्ण होण्यासाठी किमान 10 दिवसांचा तरी अवधी लागणार आहे, त्यामुळे पुढचे 10 दिवस आता तुम्हाला सिंहगडावर रस्त्याच्या मार्गानं जाता येणार नाहीये.
सांगली : चांदोली धरणाचे चारही दरवाजे उघडणार
सांगली जिल्ह्यात होत असणाऱ्या संततधारेमुळे चांदोली धरणाचे चारही दरवाजे आज टप्याटप्याने उघडले जाणार आहेत. त्यामुळे कृष्णा, वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. यामुळे वारणा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून पाऊसाची संततधार सुरू आहे.
जळगाव : हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडले
जळगावातील हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तापी नदी पात्रात 35,715 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग होतोय. महाराष्ट्राबरोबर मध्य प्रदेशात होणाऱ्या पावसामुळे हतनूर धरण वेगानं भरल आहे. पावसाचा आणि पाण्याचा जोर आणखी वाढल्यास हतनूर धरणाचे अजून दरवाजे उघडले जाण्याचा अंदाज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement