एक्स्प्लोर

आयपीएलमधील ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली

ज्या परिसरात सामने झाले तिथून कोणी तक्रार केली नाही आणि त्यापासून दूर दहिसरमध्ये याचा कसा काय त्रास झाला? असे खंडपीठाने विचारले. मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयविरोधात कठोर दंडात्मक कारवाईची मागणी याचिकादाराने केली होती.

मुंबई : क्रिकेट पाहताना चौकार आणि षटकार ठोकले किंवा विकेट गेली तर प्रेक्षक गोंगाट करणारच, त्यांना खेळाचा आनंद घेऊ द्या, असे सुनावत आयपीएल सामन्यात ध्वनी प्रदूषण झाल्याची तक्रार करणारी याचिका हायकोर्टानं सोमवारी फेटाळून लावली. विशेष म्हणजे याचिकाकर्ते के. सोनी यांचे निवासस्थान पश्चिम उपनगरातील दहिसरमध्ये आहे, याची दखलही खंडपीठाने घेतली. जर तुम्ही उपनगरामध्ये राहता तर तुम्हाला शहरामध्ये झालेल्या सामन्याचा कसा काय त्रास झाला?, असा सवालही खंडपीठाने केला. ज्या परिसरात सामने झाले तिथून कोणी तक्रार केली नाही आणि त्यापासून दूर दहिसरमध्ये याचा कसा काय त्रास झाला? असे खंडपीठाने विचारले. मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयविरोधात कठोर दंडात्मक कारवाईची मागणी याचिकादाराने केली होती. सहा वर्षांपूर्वी वानखेडे स्टेडियम आणि पुण्यातील गहूंजे स्टेडियमवर झालेल्या आयपीएल सामन्यादरम्यान ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक कायद्याचे सर्व नियम धुडकावण्यात आले, असा आरोप करत मुंबईतील एका नागरिकानं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करुन गोंगाट केला आणि त्यामुळे आसपासच्या नागरिकांना त्रास झाला, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. मात्र मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने हा दावा सपशेल फेटाळून लावला. खेळामध्ये आवाज होणारच, उत्कंठावर्धक सामन्यात प्रेक्षक मोठ्या आवाजात खेळाडूंना चिअर आणि आरडाओरड करणारच. लोकांनादेखील खेळाचा आनंद घेऊ द्यायला हवा. दिवसभराच्या धकाधकीतून विरंगुळा मिळवण्यासाठीच लोकं स्टेडियमध्ये मजा करतात, तेव्हा त्यांना मजा करु द्या, असे मुख्य न्यायमूर्तींनी याचिकादाराला सुनावले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण

Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर

क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर

ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  

Embed widget