एक्स्प्लोर
हेलो फ्रेण्ड्स हेल्मेट पेहन लो, मुंबई पोलिसांचं भन्नाट ट्वीट
सध्या चर्चेत असलेल्या 'हेलो फ्रेण्ड्स चाय पी लो' या मीम्सच्या धर्तीवर मुंबई पोलिसांनी हेल्मेट घालण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबई : सोशल मीडियावर जी मीम्स चर्चेत असतात, त्यांचा आधार घेत प्रबोधनपर ट्वीट्स करण्यात मुंबई पोलिसांचा हात कोणीच धरु शकणार नाही. सध्या चर्चेत असलेल्या 'हेलो फ्रेण्ड्स चाय पी लो' या मीम्सच्या धर्तीवर मुंबई पोलिसांनी हेल्मेट घालण्याचं आवाहन केलं आहे.
सोमवती महावर उर्फ 'पापेवाली' या फेसबुक यूझरचे व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 'हेलो फ्रेण्ड्स चाय पी लो' या सोमवतीच्या टॅगलाईनचा आधार घेत अनेक मीम्स पाहायला मिळत आहेत. त्याच्याशी साधर्म्य साधत 'हेलो फ्रेण्ड्स.. हेल्मेट पेहन लो.. टू हॅव अ 'सेफ-टी' अॅट होम' असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.
सर्वसामान्य दुचाकीस्वारांना हेल्मेटचं महत्त्व समजावं यासाठी साध्या-सोप्या आणि क्रिएटिव्ह पद्धतीने हे आवाहन करण्यात आलं आहे. वाहतुकीच्या नियमांचं पालन, सायबर क्राईमपासून बचाव, गुन्हेगारी प्रवृत्तींपासून सावधता बाळगण्याचं आवाहन वेळोवेळी मुंबई पोलिस ट्विटरवरुन करत असतात.
यापूर्वी 'रेस 3' मधील डेझी शाहच्या 'अवर बिझनेस...', 'घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही' या मीम्सवरुनही मुंबई पोलिसांनी ट्वीट केली होती.
Hello Fraaands! Helmet pehan lo... to have a Safe-Tea at home! #RoadSafeTEA pic.twitter.com/MoGTYzK8wU
— Mumbai Police (@MumbaiPolice) June 13, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement