एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई शहर, उपनगर, ठाणे तसेच कोकण विभागामध्ये 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा
पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई, ठाणे, कोकण विभागातील शाळांना आज सुट्टी जाहिर केली आहे.
मुंबई : हवामान विभागाकडून पुढील 24 तासात मुबई, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच नाशिक, सातारा, कोल्हापूर घाटपरिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईमध्ये सकाळी 8:30 पर्यंत कुलाबा वेधशाळा येथे 122.00 मिमी, सांताक्रुझ वेधशाळा येथे 118.3 मिमी इतका पाऊस झाला आहे. सकाळी 8:30 ते 11:30 पर्यंत कुलाबा वेधशाळा येथे 30.00 मिमी, सांताक्रुझ वेधशाळा येथे 121.4 मिमी इतका पाऊस झाला आहे, अशी माहिती मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली आहे.
मुंबई, ठाणे, रायगडमध्ये रेड अलर्ट, मुंबईसह कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर
पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई, ठाणे, कोकण विभागातील शाळांना आज सुट्टी जाहिर केली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांना स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी यांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वे: वसई ते विरार रुळावर पाणी साचल्यामुळे त्या दरम्यानची लोकलसेवा बंद झाली आहे.
मध्य रेल्वे: सायन ते कुर्ला, विक्रोळी ते भांडुप येथे रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे सीएसएमटी ते ठाणे लोकलसेवा बंद केली आहे
हार्बर रेल्वे: चुनाभट्टी येथे रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामूळे सीएसएमटी ते वाशी लोकलसेवा बंद केली आहे.
पश्चिम रेल्वे माहिम ते माटुंगा दरम्यान पाणी साचल्यामुळे चर्चगेट ते अंधेरी दरम्यान रेल्वे वाहतुक बंद आहे.
वसई – नालासोपारा विरार येथे पाणी साचल्यामुळे वसई विरार रेल्वे वाहतूक बंद असून अंधेरी ते वसई दरम्यान रेल्वे वाहतूक सुरू आहे.
दादर- टिळक पूल, हिंदमाता जक्शन, कुर्ला- श्रध्दा जंक्शन, माला गार्डन, बंटर भवन, लायब्रेरी जंक्शन झोन आठ बीकेसी सायन – षण्मुखानंद हॉल, एस. आय. ई. एस कॉलेज, अंधेरी - एस.व्ही. रोड, अंधेरी सबवे, वडाळा सर्कल पंचायत या ठिकाणी पाणी साचले आहे.
रायगड - ताम्हणी घाट, माणगाव जवळ रस्त्यावर माती आली असल्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. माती काढण्याचे काम सुरू असून त्यानंतर सदर वाहतूक सुरू करण्यात येईल.
रायगडमधील कुंडलीका व अंबानदी यांनी धोक्याची पातळी गाठली असून सदर नदीजवळील रस्ते वाहतूकीकरीता बंद करण्यात आले आहे.
आणखी पावसाच्या बातम्या
गडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला
मुसळधार पावसामुळे लोकलसेवेवर परिणाम, मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प तर पश्चिम रेल्वेलाही फटका
पुणे : मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला, भिडे पूल पाण्याखाली
सलग दुसऱ्या दिवशी मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, येत्या 24 तासात महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोरदार पावसाचा इशारा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement