एक्स्प्लोर

समीर भुजबळ यांना कोर्टाचा तूर्तास दिलासा नाहीच!

समीर भुजबळ यांना अंतरिम जामीन देण्यास मुंबई हायकोर्टाने तूर्तास नकार दिला. पुढील सुनावणी 15 मे रोजी ठेवण्यात आली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकचे माजी खासदार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना अंतरिम जामीन देण्यास मुंबई हायकोर्टाने तूर्तास नकार दिला. हायकोर्टात महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात भारताचे ॲडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग हे बाजू मांडत आहेत. ते बुधवारी उपस्थित नसल्याने ईडीने पुढची तारीख मागितली. समीर भुजबळांना तोपर्यंत अंतरिम जामीन देण्यात यावा, अशी मागणी भुजबळ यांच्यावतीने केली गेली. तसेच या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या छगन भुजबळ यांनाही नुकत्याच देण्यात आलेल्या जामिनाचा दाखला देत, समानतेच्या मुद्यावर जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी समीर भुजबळ यांच्या वतीने करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने पीएमएलए कायद्यातील कलम 45 घटनात्मकदृष्ट्या वैध नसल्याचा निकाल दिल्यानंतर आत्तापर्यंत 53 जणांना जामीन देण्यात आला आहे. केवळ आपणच जामिनापासून वंचित असल्याचा युक्तीवाद समीर भुजबळांतर्फे करण्यात आला. पण हायकोर्टाने समीर यांना कोणताही दिलासा न देत सुनावणी 15 मे रोजी ठेवली आहे. पुढील सुनावणीला ईडीला त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. भुजबळ सुटले! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना 4 मे रोजी जामीन मंजूर झाला. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ बाहेर आले. मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळांचं वय लक्षात घेत जामीन मंजूर केला. भुजबळांना 5 लाखांचा जामीन मंजूर झाला. बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणं, साक्षीदारांना प्रभावित न करणं, या अटींवर छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला. दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ अटकेत होते. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम नुकतेच रद्द केलं. त्याचा फायदा घेत आपली जामीनावर मुक्तता करावी, अशी भुजबळ यांची मागणी होती. संबंधित बातम्या : छगन भुजबळांना नेमकी कोणत्या प्रकरणात अटक?   छगन भुजबळांची चौकशी आणि अटकेचा संपूर्ण घटनाक्रम  कलम 45 घटनाबाह्य, छगन भुजबळांना दिलासा मिळणार?  ‘माझ्यावरील आरोप खोटे, दमानियांवर कायदेशीर कारवाई करु’, भुजबळांचं जेलमधून पत्र  भुजबळ लढवय्ये, ते जेलबाहेर आले पाहिजेत: मंत्री दिलीप कांबळे 

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
Mumbai High Court FDA: 'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget