मुंबई : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल दोन विविध याचिकांनवर येत्या 21 ऑगस्टला सुनावणी घेण्याचं शुक्रवारी निश्चित करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयात येत्या 18 ऑगस्टला सुनावणी होणार असल्यानं आपण इथं सुनावणी घेण्याची घाई करायला नको, असं हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सीबीआयनं या प्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची केंद्र सरकारच्यावतीनं शुक्रवारी हायकोर्टात माहिती देण्यात आली. तसेच सुशांत सिंह प्रकरणी मुंबईत तपास करायला बाहेरच्या राज्यातून आलेल्या पोलीस अधिकाऱ्याला स्थानिक प्रशासनानं जबरदस्तीनं क्वॉरंटाईन केल्याची तक्रार केंद्र सरकारकच्यावतीनं अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांच्यावतीनं कोर्टात करण्यात आली. तसेच मुंबई पोलीस याप्रकरणी इतर तपास यंत्रणांच्या मार्गात अडथळे निर्माण करत असल्याबद्दल सिंह यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र तूर्तास हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना यासंदर्भात कोणतंही भाष्य करणं योग्य नाही, असं म्हणत हायकोर्टानं सुनावणी 21 ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे.


पाहा व्हिडीओ : रिया चक्रवर्तीच्या ईडी चौकशीत काय काय समोर आलं? स्पेशल रिपोर्ट



बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे म्हणजेच एसआयटीकडे वर्ग करावा, अशा मागण्या करणाऱ्या दोन जनहित याचिका हायकोर्टात दाखल झाल्या आहेत. सुशांतने 14 जून रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांतने मानसिक दबावाखाली आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यावर मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलिसांकडून होत असलेल्या उशिरामुळे प्रत्येक दिवशी महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे नष्ट केली जात असल्याचा दावा करत एक जनहित याचिका नागपूरचे रहिवासी असलेल्या समीर ठक्कर यांनी दाखल केली आहे. बॉलिवूड, राजकारण आणि अंडरवर्ल्ड यांचे एकमेकांशी असलेल्या संबंधांचा सुशांत बळी ठरल्यामुळे त्याने आत्महत्या केली, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.


सुशांत सिंह राजपूत प्रकरणात CBI कडून रिया चक्रवर्तीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल


तर एका यशस्वी अभिनेत्याने अचानकपणे केलेल्या आत्महत्येमुळे सर्वसामान्यांच्या मनात बॉलीवूडमधील नेपोटिझमविरोधात आक्रोश पहायला मिळत आहे. तसेच सुशांतच्या मृतदेहाचे फोटो हे सर्वसमान्यांमध्ये लीक झाले. यामुळे मुंबई पोलिसांच्या तपास प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करत या प्रकरणाची सीबीआय किंवा विशेष तपास पथक म्हणजेच (एसआयटी) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी दुसरी जनहित याचिका कोलकाता न्यायालयात वकिल असलेल्या प्रियांका तिब्रेवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी


रियाने मुंबईत घेतला 76 लाखांचा फ्लॅट, एकटीने भरली 45 टक्के रक्कम