मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीची संपत्ती आणि आर्थिक व्यवहारांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. यादरम्यान, एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्तीने मुंबईतील खार (पूर्व) येथील गोलीबार परिसरातील गुलमोहर एवेन्यू येथे 2018 मध्ये एक फ्लॅट बुक केला होता.


महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या फ्लॅटची किंमत 76 लाख रुपये आहे आणि जीएसटी, स्टॅम्प ड्युटी इत्यादी भरल्यानंतर रियाला या फ्लॅटसाठी जवळपास 80 लाख रुपये मोजावे लागले होते. रियाने हा फ्लॅट 2018 फेब्रुवारी-मार्च महिन्यात खरेदी केला होता. या संबंधी एबीपी न्यूजने गुलमोहर एवेन्यू येथील सेल्स मॅनेजर विशाल जाधव यांच्याशी संवाद साधला. विशालने दिलेल्या माहितीनुसार, 2018मध्ये प्री-लॉन्च ऑफर दरम्यान रिया चक्रवर्तीने हा फ्लॅट बुक केला होता. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, दोन वेळा ती या बिल्डिंगच्या साइटवरही आली होती. एकदा फ्लॅट खरेदी करण्याआधी पाहण्यासाठी आणि त्यानंतर फ्लॅटच्या बुकींगसाठी.'


बँकेतून कर्ज काढलं


विशाल यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, रिया चक्रवर्तीने या बिल्डिंगमध्ये फ्लॅट खरेदी करण्यासाठी एचडीएफसी बँकेत 50 लाख रुपयांचे बँक लोन घेतले आहे. तसेच फ्लॅट खरेदी करतानाचे संपूर्ण पैसे रियाच्या अकाउंटमधूनच देण्यात आले आहेत. महत्त्वांचं म्हणजे, रियाने या फ्लॅटसाठी आतापर्यंत 45 टक्के रक्कम भरली आहे.


पाहा व्हिडीओ : रिया चक्रवर्तीची ईडी चौकशी, आर्थिक व्यवहारांबाबत ईडीला संशय



दरम्यान, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाने एक नवं वळण घेतलं आहे. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तपासाच्या दुहेरी कचाट्यात सापडली आहे. सीबीयाकडून रिया चक्रवर्तीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली असून ईडीकडूनही रियाची चौकशी आज करण्यात येणार आहे. रिया चक्रवर्ती या चौकशीसाठी उपस्थित राहणार की, नाही? यावरुन अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात येत होत्या. अशातच रिया चक्रवर्तीने चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे. दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर कोरोना होण्याच्या भितीमुळे रिया चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात होतं.


महत्त्वाच्या बातम्या :