मुंबई : मला क्वॉरंटाईन नव्हतं केलं तर मुंबई पोलिसांनी आमच्या तपासाला कॉरंटाईन केलं होतं, अशा तीव्र शब्दांत पाटण्याचे एसपी विनय तिवारी यांनी मुंबई पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. मागील 7 दिवसांपासून मला क्वॉरंटाईन करण्यात आलं याचा आमच्या तपासावर परिणाम झाला आहे. सुशांत सिंग प्रकरणाचा तपास आम्ही खुप कमी वेळात चांगला केला होता. परंतू मुंबई पोलिसांनी त्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, असं विनय तिवारी यांनी म्हटलं.


पुढील 3 दिवसांत आम्ही जो तपास केला आहे. तो लिखित स्वरूपात आम्ही सुप्रीम कोर्टात मांडणार आहोत. मुंबई पोलिसांचं माझ्यासोबतचं वागणं चांगलं होतं. त्यांचा कायदा त्यांनी आम्हाला सांगितला, आम्ही त्याचं पालन केलं. परंतु त्यामुळे तपासावर परिणाम झाला. जे आमच्यासोबत झालं ते चुकीचं झालं आहे. त्यामुळे तपासावर परिणाम झाला. आमचा सुशांत सिंग प्रकरणाचा तपास करण्याचा हक्क होता परंतु त्यावर मुंबई पोलिसांनी गदा आणली. कोणताही तपास करत असताना अडथळे येतं असतात. आम्ही त्यावर मात करून नक्कीच पूढे जाऊ. या संपूर्ण प्रकरणाचा बिहार पोलिस चांगल्या पद्धतीने तपास करत होती. त्यामध्ये आम्हाला अडथळा आणला आहे. आम्ही ज्या गतीने तपास करत होतो. त्या गतीने आम्हांला तपास करू दिला नाही. अशा शब्दांत विनय तिवारी यांनी मुंबई पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. आज ते आपला क्वॉरंटाईनचा कालावधी पुर्ण करून पुन्हा पाटण्याला रवाना झाले आहेत. गुरुवारी त्यांची 4 जणांची टीम देखील पुन्हा पाटण्याला रवाना झाली आहे.


मागील जवळपास 7 दिवसांपासून मुंबईत क्वॉरंटाईन करण्यात आलेले पाटण्याचे एसपी विनय तिवारी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तसेच मुंबईत या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना लीड करण्यासाठी मुंबईत आले होते. ज्या दिवशी विनय तिवारी मुंबईत आले त्याच दिवशी मुंबई महानगरपालिकेने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर त्यांना क्वॉरंटाईन केलं होतं. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचलं होतं.


विनय तिवारी यांचं मुंबईतील क्वॉरंटाईन संपवण्यासाठी गुरुवारी याचिका देखील दाखल करण्यात आली होती. अखेर आज सकाळी त्यांचा क्वॉरंटाईनचा कालावधी संपवण्यात आला आणि संध्याकाळी 5 च्या फ्लाईटने ते बिहारच्या दिशेने रवाना झाले. या काळात मुंबई पोलिसांबाबत तिवारी यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. मी मुंबईत तपास करण्यासाठी आलो होतो सुट्ट्यांसाठी नाही. त्यामुळे क्वॉरंटाईन कालावधीत देखील माझं काम सुरूच होतं असं देखील तिवारी म्हणाले. दरम्यान ईडीकडून रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबाबत बोलताना तिवारी म्हणाले कीं आता हा तपास सीबीआयकडे गेला आहे. त्यामुळे त्याबाबत बोलणं योग्य होणार नाही. परंतु आम्ही केलेला तपास तीन दिवसांनंतर आम्ही सुप्रीम कोर्टात लिखित रूपात मांडू, असं त्यांनी सांगितलं.


महत्त्वाच्या बातम्या :