PHOTO | सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी
महत्त्वाचं म्हणजे, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयने अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह सहा इतर लोकांविरोधात एफआयआर दाखल केले आहेत. एफआयआरमध्ये रिया व्यतिरिक्त इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, शमूएल मिरांडा, श्रुति मोदी आणि अन्य एका नावाचा समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, तपासा दरम्यान, खुलासा झाला आहे की, काही दिवसांपूर्वीच रिया चक्रवर्तीने खारमध्ये दोन फ्लॅट खरेदी केले होते.
रियावर आरोप लावण्यात आले आहेत की, सुशांतचा फ्लॅट सोडण्याआधी सुशांतचे बँक पासबुक, क्रेडिट कार्ड आणि त्याचे पासवर्ड घेऊन गेली होती. त्याचसोबत एक लॅपटॉप आणि दागिनेही ती आपल्यासोबत घेऊन गेली होती.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूतचे वडील के.के. सिंह पाटना पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. ज्यामध्ये त्यांनी रिया चक्रवर्ती मुख्य आरोपी असल्याचं सांगितलं होतं.
ईडीने कही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीच्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) रितेश शाह आणि चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांच्याकडे चौकशी केली होती. ईडी सुशांत सिंह राजपूतचे पैसे आणि त्यांच्या बँक अकाउंटचा दुरुपयोग केल्याच्या आरोपाची चौकशी करत आहे.
ईडीच्या सुत्रींनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान ज्या बाबी समोर आल्या आहेत. त्या आधारावर ईडीने याप्रकरणी रियाच्या चौकशीसाठी प्रश्नावली तयार केली आहे. ज्यामध्ये 3 टप्प्यांमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत.'
रिया चक्रवर्ती ईडीच्या चौकशीपासून गेल्या अनेक दिवसांपासून दूर राहत होती. तिचे वकील ईडीकडे विनंती अर्ज दाखल केला होता. ज्यामध्ये जोपर्यंत याप्रकरणाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पार पडत नाही, तोपर्यंत रियाची चौकशी करू नये. परंतु, ईडीने त्यांची ही मागणी फेटाळली.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाअतंर्गत सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली. ईडीने गेल्या शुक्रवारी रियाला समन्स पाठवत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -