एक्स्प्लोर
#HappyBirthdaySachin | सचिनला अनोख्या शुभेच्छा देत 'जबराफॅन'कडून फाईट अगेन्स्ट कोरोनाचा संदेश
आज मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे. तो 47 व्या वर्षात पदार्पण केलंय. यानिमित्ताने त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.

मुंबई : सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. लाखो लोकांचा जीव या भयानक विषाणूनं घेतला आहे. संपूर्ण जग सध्या लॉकडाऊनमध्ये आहे. अश्या परिस्थितीत जगभरातील क्रिकेटरसिकांचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. सचिननं कोरोनाची गंभीरता लक्षात घेत यंदा आपल्या वाढदिवसाचं कोणतंही सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लॉकडाऊनच्या परिस्थितीतही सचिनच्या डायहार्ड फॅन्सनी त्याला शुभेच्छा पाठवल्या आहेत.
मुंबईतील लालबागमध्ये राहणारा सचिनचा असाच एक जबराफॅन आहे, अभिषेक साटम. अभिषेकनं 'लढूया कोरोना विरुद्ध' असा संदेश देणारं 5.6 x 4 फुटांच एक चित्र बनवलं आहे. ज्यात अर्ध्या इंचाच्या आकाराचे चौकोन वापरण्यात आले आहेत. त्या साठी काळा, निळा, पिवळा, पांढरा, हिरवा, लाल, पोपटी, ह्या रंगाच्या चौकोनाचा वापर केला गेला आहे. एकूण 9637 चौकोनांचा वापर करून 3 बाय 5.6 फुटांची कलाकृती ही कलाकृती अभेषकनं 15 तासांच्या अथक परिश्रमांतून साकारली आहे.

आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























