एक्स्प्लोर
जीएसटी मंजुरीमुळे 'मातोश्री'ला काय मिळणार? : वळसे-पाटील
![जीएसटी मंजुरीमुळे 'मातोश्री'ला काय मिळणार? : वळसे-पाटील Gst Session Dilip Walse Patils Questions Tu Sudhir Mungantiwar जीएसटी मंजुरीमुळे 'मातोश्री'ला काय मिळणार? : वळसे-पाटील](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/20130647/Dilip-Walse-patil-Sudhir-Mungantiwar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीवरुन सध्या विशेष अधिवेशन भरवण्यात आलं आहे. विधानभवनात जीएसटीवर चर्चा सुरु आहे.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटीचा प्रस्ताव सभागृहासमोर मांडला. मात्र विरोधकांनी जीएसटीमधील त्रुटींवर बोट ठेवलं.
"जीएसटीच्या मंजुरीसाठी दिल्लीत नेमकं काय घडलं आणि मातोश्रीला काय मिळणार हे आम्हालाही सांगा" असा खोचक टोला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मुनगंटीवारांना मारला.
जीएसटीला हिरवा कंदील मिळावा यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
शेतकरी कर्जमाफीवरही चर्चा करा
दुसरीकडे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जीएसटीबरोबर शेतकरी कर्जमाफीवरही चर्चा करावी अशी मागणी केली. जीएसटी ज्याप्रमाणे महत्त्वाचं आहे, त्याप्रमाणे शेतकरी कर्जमाफीही महत्त्वाची आहे, असं विखे पाटील म्हणाले.
संबंधित बातम्या
GST मुळे काय महाग, काय स्वस्त?
जीएसटीसाठी विशेष अधिवेशन, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)