एक्स्प्लोर
कमला मिल आग प्रकरणी आरोपी विशाल करियाला जामीन मंजूर
कमला मिल आग प्रकरणातील आरोपी विशाल करियाला भोईवाडा कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. १० हजारांच्या जातमुचलक्यावर करियाची सुटका झाली आहे.
मुंबई : कमला मिल आग प्रकरणातील आरोपी विशाल करियाला भोईवाडा कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. १० हजारांच्या जातमुचलक्यावर करियाची सुटका झाली आहे. आग लागली त्या प्रकरणात त्याचा थेट संबंध नाही, तसंच त्याची त्या रेस्टॉरंटमध्ये मालकी किंवा भागीदारी नाही. त्याच्यावर केवळ आरोपींना आश्रय दिल्याचा आरोप होता. मात्र, याप्रकरणात आरोपीला जामीन मिळू शकतो, त्यामुळे त्याला जामीन दिला जात आहे. असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
९ जानेवारीला करियाला मुंबईत अटक झाली होती. त्यानंतर भोईवाडा कोर्टानं त्याला १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. ज्याला करियानं सोमवारी हायकोर्टात आव्हान दिलं होतं.
कमला मिल खटल्यातील आरोपी विशाल करियाला दिलासा देत मुंबई उच्च न्यायालयानं त्याला रितसर जामीन अर्ज करण्याची परवानगी दिली. केवळ अभिजीत मानकरची गाडी स्वत:जवळ ठेवली म्हणजे आपला या अग्निकांडाशी थेट संबंध आहे असा मुंबई पोलिसांचा आरोप चुकीचा आहे. असा दावा करत विशाल करियानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांनी सरकारी वकिलांना विचारणा केली की, तुमच्याकडे करिया विरोधात आणखी सबळ पुरावे आहेत का? जेणेकरून तुम्ही त्याच्यावर आणखी कलम लावू शकता? यावर सरकारी वकिलांनी नकारार्थी उत्तर दिलं. करियावर आणखीन गंभीर कलम लावण्यासाठी पुरावे नसल्याची सरकारी वकिलांनी कबुली दिल्यानं हायकोर्टानं करियाची याचिका स्वीकारत त्याला खालच्या कोर्टात रितसर जामीन अर्ज करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तातडीनं करियाच्यावतीनं भोईवाडा कोर्टात जामीनासाठी दाखल केलेला अर्ज मान्य करण्यात आला.
संबंधित बातम्या :
कमला मिल अग्नितांडवप्रकरणी आणखी एकाला अटक
कमला मिल अग्नितांडव : मोजोसच्या मालकाविरोधात अखेर गुन्हा दाखल
'मोजोस बिस्ट्रो मधल्या शेगडीमुळेच कमला मिल्स कंपाऊंडमध्ये अग्नितांडव'
कमला मिल घटनेदिवशी माझ्यावर नेत्यांकडून दबाव : बीएमसी आयुक्त
कमला मिल्स आगीतून जखमींना वाचवणाऱ्या सुदर्शन शिंदेंचा सत्कार
कमला मिल आग : '1 अबव्ह' हॉटेलच्या दोन मॅनेजरना अटक
कमला मिल आग : '1 अबव्ह'च्या मालकांच्या काकाविरोधात गुन्हा
मुंबईतील अग्नितांडवाला ठाकरे कुटंबीय जबाबदार : नितेश राणे
अपघात नव्हे हत्या, कमला मिलच्या आगीत 14 निष्पापांचा मृत्यू
कमला मिल आग : तीन आरोपींविरोधात लूकआऊट नोटीस
बीएमसीची मोजोस् बिस्त्रो आणि 1 Above विरोधात तक्रार
अग्नितांडवानंतर अनधिकृत बांधकामांवर हातोडा, बीएमसीची कारवाई
1Aboveचं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश, मात्र कारवाई नाहीच : खान
हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, अधिकाऱ्यांवरही करु: मुख्यमंत्री
कमला मिल आग: 5 अधिकारी निलंबित
भेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटील
कमला मिल आग: टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा!
कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं!
कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक'
कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर...
कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली
मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू
मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement