News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

दाऊदच्या सहा मालमत्तांचा केंद्राकडून लिलाव होणार

14 नोव्हेंबर 2017 रोजी सहाही मालमत्तांचा लिलाव होणार असून बेस किंमत 5.54 कोटी रुपये असेल.

FOLLOW US: 
Share:
मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यास केंद्राने सुरुवात केली आहे. दाऊदच्या सहा मालमत्तांचा लिलाव केंद्र सरकार करणार आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी केंद्राने हॉटेल रौनक अफरोझ म्हणजेच 'दिल्ली झायका'चा लिलाव करण्याचा प्रयत्न केला होता. आता याच हॉटेलसोबत आणखी पाच मालमत्तांचा लिलाव करण्याची घोषणा अर्थमंत्रालयाने केली आहे. स्मगलर्स आणि परदेशी विनिमय नियंत्रक कायद्या (SAFEMA)च्या प्रशासकांनी वर्तमानपत्रात सार्वजनिक लिलावासंदर्भात जाहिरात दिली आहे. 14 नोव्हेंबर 2017 रोजी सहाही मालमत्तांचा लिलाव होणार असून बेस किंमत 5.54 कोटी रुपये असेल. यामध्ये भेंडी बाजार परिसरातील दमरवाला इमारतीचा समावेश आहे. या इमारतीत दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर राहतो. दुबईला जाण्यापूर्वी दाऊद याच परिसरात राहत असे. दाऊदची आई अमिना बी यांनी ही इमारत 1980 मध्ये विकत घेतली होती. याशिवाय मोहम्मद अली रोडवरील शबनम गेस्ट हाऊस, माझगावातील पर्ल हार्बर इमारतीतील एक फ्लॅट, सैफी ज्युबिली स्ट्रीटवरील दादरीवाला चाळीतील एका खोलीचे भाडेकरार अधिकार आणि औरंगाबादमधील 600 चौरस फूट फॅक्टरीचा प्लॉट या मालमत्तांचा लिलाव होईल. याआधी, पत्रकार एस बालकृष्णन यांचा एनजीओ 'देश सेवा समिती'ने हॉटेल रौनक अफरोझसाठी 4.28 कोटी रुपयांची सर्वाधिक किमतीची बोली लावली होती. 30 लाखांची अनामत रक्कम भरल्यानंतर 30 दिवसांच्या कालावधीत उर्वरित 3.98 कोटींची रक्कम भरता न आल्यामुळे ती मालमत्ता त्यांच्या हातून निसटली. यावेळी हॉटेल रौनक अफरोझसाठी अनामत रक्कम 6.28 लाखांनी घटवून 23.72 लाख रुपये करण्यात आली आहे. या मालमत्तेची बाजारातील किंमत 6 ते 8 कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे.
Published at : 19 Oct 2017 10:41 AM (IST) Tags: मालमत्ता auction Central Government लिलाव property केंद्र सरकार दाऊद इब्राहिम dawood ibrahim Mumbai

आणखी महत्वाच्या बातम्या

मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल

मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल

लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा

लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा

कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव

कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार

मदर डेअरीनं मुंबईतील ग्राहकांसाठी लाँच केलं शुद्ध 'म्हशीचं दूध', दुधाची किंमत किती?

मदर डेअरीनं मुंबईतील ग्राहकांसाठी लाँच केलं शुद्ध 'म्हशीचं दूध', दुधाची किंमत किती?

टॉप न्यूज़

Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य

Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य

Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर

Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर

''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन

''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विधानभवनवर आक्रोश मोर्चा, काय आहेत मागण्या? 

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विधानभवनवर आक्रोश मोर्चा, काय आहेत मागण्या?