एक्स्प्लोर
संजय तुर्डेंना गटनेतेपद द्या, राज ठाकरेंचं मुंबई पालिकेला पत्र
मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या सहा नगरसेवकांना कोकण आयुक्तांनी नोटीस बजावली आहे.
मुंबई : नगरसेवक संजय तुर्डे यांना मनसेचं गटनेतेपद द्या, अशी मागणी करणारं पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला धाडलं आहे. संजय तुर्डे हे मनसेचे एकमेव नगरसेवक आहेत.
कोकण भवन आयुक्तांनी मनसे आणि शिवसेनेच्या याचिका दाखल करुन घेतल्यानंतर मनसेचा जुना गट हा सध्या तरी कायम आहे. मात्र मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दिलीप लांडे यांच्या नावावरचे गटनेतेपद संजय तुर्डे यांना देण्याची मागणी केली आहे.
मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांनी राज ठाकरेंना ठेंगा दाखवला आणि शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता मनसेच्या एकमेव नगरसेवकाला गटनेतेपदाची मागणी राज ठाकरेंनी केली आहे. यापूर्वी दिलीप लांडे यांच्याकडे हे गटनेतेपद होतं.
महापालिका सभागृहात महापौर नव्या गटनेत्यांचे नाव जाहीर करणार आहे. आता नोव्हेंबरमध्ये सभागृह भरेल. त्यावेळी मनसेचं गटनेतेपद संजय तुर्डेंकडे दिलं जाण्याची शक्यता आहे.
तिकडे मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या सहा नगरसेवकांना कोकण आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल आपलं लेखी म्हणणं मांडा, असं या नोटिशीत म्हटलं आहे. आता हे सहा नगरसेवक सोमवारी आपलं स्पष्टीकरण कोकण आयुक्तांकडे देण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेत मनसेचा आता एकच नगरसेवक
अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, अश्विनी मतेकर, दिलीप लांडे, हर्षल मोरे, दत्ताराम नरवणकर हे सहा नगरसेवक मनसेतून शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांनी 13 ऑक्टोबररोजी शिवसेनेत प्रवेश केला. तर वॉर्ड क्र. 166 मधील नगरसेवक संजय तुर्डे हे मनसेतच राहिले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत मनसेचा एकच नगरसेवक उरला आहे.
संबंधित बातम्या :
शिवसेनेत गेलेल्या मनसेच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल होणार?
मनसेकडून नगरसेवकांना व्हीप जारी, सभागृहात कोण- कुठे बसणार?
मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक आमच्यासोबतच : शिवसेना
शिवसेनेत गेलेले 4 नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार?
7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक
पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!
शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत
मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?
मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!
करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप
दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले
‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
क्राईम
राजकारण
Advertisement