एक्स्प्लोर
धर्मा पाटील यांना शहीद भूमीपुत्र शेतकऱ्याचा दर्जा द्या : नरेंद्र पाटील
धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं.
![धर्मा पाटील यांना शहीद भूमीपुत्र शेतकऱ्याचा दर्जा द्या : नरेंद्र पाटील Give Dharma Patil the status of a martyr land farmer: Narendra Patil धर्मा पाटील यांना शहीद भूमीपुत्र शेतकऱ्याचा दर्जा द्या : नरेंद्र पाटील](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/29074438/dharma-narendra.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आपल्याला न्याय मिळावा यासाठी मंत्रालयाच्या दारात विष पिणाऱ्या धर्मा पाटील यांचा अखेर मृत्यू झाला. काल रात्री त्यांचं निधन झालं. 22 जानेवारीला विष प्राशन केल्यापासून त्यांच्यावर मुंबईतल्या जेजे रुग्णालयात उपचार सुरु होते.
जमिनीचा योग्य मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमीपुत्र शेतकऱ्याचा दर्जा सरकार लेखी आश्वासनात देणार नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे.
धर्मा पाटील यांचं नेत्रदान
मृत्यूनंतर धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांनी नेत्रदानाचा निर्णय घेतला आहे. धर्मा पाटील यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी अवयवदानाचा फॉर्म भरुन दिला होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.
भाजप सरकार हे कडेलोट करण्याच्या लायकीचं: राजू शेट्टी
धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं. धर्मा पाटलांच्या विषप्राशनानंतर जाग आलेल्या सरकारनं पाटील यांच्या कुटुंबियांना 15 लाखाचं सामुग्रह अनुदान देऊ केलं. मात्र अनुदान नको, आम्हाला मोबदला द्या, अशी मागणी लावून पाटील कुटुंबाने धरली आहे. संबंधित बातम्या :धर्मा पाटलांची प्रकृती चिंताजनक, अवयवदानाचा अर्ज भरला
15 लाखांचं अनुदान धर्मा पाटलांच्या मुलाने नाकारलं
मंत्रालयात 80 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)