एक्स्प्लोर
राज्यातील सर्वच टोल माफ करा, मुंबईतील नगरसेवकांची मागणी

मुंबई : राज्यातील सर्वच टोल माफ करावेत, अशी मागणी मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांनी केली आहे. विशेष म्हणजे महापालिका सभागृहात एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मुंबईतील नगरसेवकांना वांद्रे-वरळी सी लिंकवर टोलमाफी दिली आहे. आता राज्यातील सर्वच टोल माफ करावेत, अशी नगरसेवकांची मागणी आहे. मुंबईतील अनेक नगरसेवकांना अनेक उपक्रमांना भेटी देण्यासाठी शहराबाहेर जावं लागतं. तसंच खासदार आणि आमदारांना सर्व टोलनाक्यावर विनामूल्य प्रवास सवलत आहे. त्यासाठी टोलमाफी मिळावी असं नगरसेवकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता राज्य सरकार, व्हीआयपी ट्रीटमेंट देत नगरसेवकांना टोलमाफी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रिकेट
निवडणूक























