एक्स्प्लोर
मुंबईत गोरेगावमध्ये प्रेयसीचा प्रियकरावर अॅसिड हल्ला
मुंबई: आतापर्यंत तुम्ही एकतर्फी प्रेमातून तरुणानं तरूणीवर अॅसिड हल्ला केल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील. मात्र, मुंबईच्या गोरेगाव परिसरात तरूणीनं तरूणावर अॅसिड हल्ला केल्याची खळबळजन घटना उघडकीस आली आहे. ओमसिंग सोळंकी असं जखमी झालेल्या तरूणाचं नाव असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना काल (गुरुवार) संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली. ओमसिंग सोळंकी याचे 25 वर्षीय महिलेशी प्रेमसंबंध होते. पण मागील काही दिवसांपासून या दोघांमध्ये दुरावा आला होता. ओमसिंग हा बरेच दिवस आपल्या प्रेयसीशी बोलतही नव्हता. तसंच तिला भेटतही नव्हता. याच रागातून प्रेयसीनं ओमसिंगवर अॅसिड हल्ला केला.
काल ओमसिंग आणि या महिलेची गोरेगावमध्ये भेट झाली होती. त्यावेळी या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झालं. तेव्हा आरोपी महिलेनं ओमसिंगला शिवीगाळ करत ऑसिडसारखं द्रव्य त्याच्या अंगावर फेकलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement