घाटकोपरच्या रुग्णालयात गंभीर रुग्णासह तिघे तब्बल तीन तास रुग्ण लिफ्टमध्ये अडकले!
घाटकोपरमधील झायनोव्हा रुग्णालयात काल एक खळबळजनक प्रकार घडला. रुग्णालयात आलेला अन् प्रकृती चिंताजनक असलेला रुग्ण लिफ्टमध्ये तब्बल तीन तास अडकला.
Ghatkopar News Updates: घाटकोपरमधील झायनोव्हा रुग्णालयात (Ghatkopar Hospital) काल एक खळबळजनक प्रकार घडला. रुग्णालयात आलेला अन् प्रकृती चिंताजनक असलेला रुग्ण लिफ्टमध्ये (stuck in Lift) तब्बल तीन तास अडकला. त्या रुग्णासह आणखी दोघेजण या लिफ्टमध्ये अडकल्याने काही वेळ रुग्णालयात खळबळ उडाली होती. जयश्री जयसिंग सकपाळ यांना त्यांचे मुले वैभव आणि जितेंद्र हे घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर असलेल्या झायनोव्हा रुग्णालयात डायलिसीस करण्यास आले होते.
संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान त्यांनी रुग्णांसाठी असलेल्या लिफ्टमधून रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लिफ्ट एक मजला वर गेली आणि बंद पडली.यावेळी रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा मात्र मोठ्या प्रमाणात समोर आला आहे. रुग्णालयाकडून मदत मिळत नसल्याने अखेर सकपाळ कुटुंबाने त्यांच्या जवळील नातेवाईकांना फोन केला आणि त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांशी संपर्क साधला आणि तीन तासानंतर त्यांची सुटका झाली.
या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. काल सायंकाळच्या सुमारास जयश्री जयसिंग सकपाळ यांना त्यांची मुलं वैभव आणि जितेंद्र हे झायनोव्हा रुग्णालयात डायलिसीस करण्यासाठी घेऊन आले होते. संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान त्यांनी रुग्णांसाठी असलेली लिफ्टमधून रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, लिफ्ट एका मजल्यानंतर बंद पडली. यावेळी आत अडकलेल्या वैभव आणि जितेंद्र यांनी रुग्णालयाकडे मदत मागीतली मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या जयश्री सपकाळ यांनी देखील मदतीसाठी विनंती केली.
बराच वेळ होऊन देखील रुग्णालयाकडून कुठलीही मदत मिळाली नाही. यानंतर रुग्णालयाकडून मदत मिळत नसल्याने अखेर वैभव आणि जितेंद्र यांनी सकपाळ यांनी त्यांच्या जवळील नातेवाईकांना फोन करुन त्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली आणि त्यांची सुटका केली.
रुग्णालयात पोहोचलेल्या सकपाळ यांच्या नातेवाईकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तीन तासानंतर त्यांची सुटका झाली. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणाबाबत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
अद्याप या घटनेवर रुग्णालय प्रशासनाची बाजू समोर आलेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या