एक्स्प्लोर
Advertisement
भाजपने माघार घेतली, तरी मी स्थायी समितीत बसणार : गीता गवळी
मुंबई : महापौरपदाच्या स्पर्धेतून भाजपने बिनशर्त माघार घेतली असली, तरी आपणच स्थायी समितीत बसणार, असा विश्वास अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी व्यक्त केला आहे. भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात मिळालेल्या आश्वासनांमुळे गीता गवळी यांच्याकडे सर्वांचेच लक्ष होतं. त्यावरुनच त्यांनी आपली भूमिका मांडताना स्थायी समितीत आपल्याला नक्की स्थान मिळणार, असा विश्वास एबीपी माझाकडे व्यक्त केलाय.
याशिवाय शिवसेनेकडून बोलावणं आलं, तर आपण चर्चेसाठी तयार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या प्रश्नावर गीता गवळी म्हणाल्या की, ''शिवसेनेसोबत गवळी परिवाराचे चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरेंचा मी नेहमी आदर करते. त्यामुळे शिवसेनेसोबत मी आधीपासूनच होते, आणि आताही असणार आहे.''
विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुक्तकंठाने स्तुती केली. भाजपचा माघार घेण्याचा निर्णय योग्यच असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मारलेला हा सिक्सर आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. शिवाय मुख्यमंत्र्यांनी स्थायी समिती सदस्यपदाबाबत जो शब्द दिला आहे, तो ते नक्की पाळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंबईत नेमण्यात येणाऱ्या उपलोकायुक्त पदाच्या निर्णयाचंही त्यांनी यावेळी स्वागत केलं आहे. ''मुंबईत उपलोकायुक्तांची नेमणूक होणार, त्यामुळे मुंबईकरांचंच भलं होईल,'' अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केलीय.
संबंधित बातम्या
भाजपच्या बिनशर्त माघारीमुळे गीता गवळींची पंचाईत?
मुंबईत भाजप महापौरपदाची निवडणूक लढणार नाही !
..म्हणून गीता गवळी यांनी शिवसेनेची साथ सोडली ?
शिवसेना-भाजप एकत्र येतील, याची 200 टक्के खात्री : पाटील
उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं नाही : गीता गवळी
महापौरपदासाठी काँग्रेसचाही उमेदवार, राष्ट्रवादी म्हणते..
मुंबईच्या महापौरपदासाठी गीता गवळींचा भाजपला पाठिंबा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement