एक्स्प्लोर
पतीचा आधीच समलैंगिक विवाह, पत्नीला लग्नानंतर कळलं!
एका मुलाने मुलीशी लग्न करण्यापूर्वी चक्क एका मुलाशी लग्न केल्याचा प्रकार कल्याणात समोर आला आहे.

कल्याण : लग्न हा कुठल्याही मुला-मुलीच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. कारण लग्न म्हणजे त्या दोघांचं विश्वासावर टिकणारं आयुष्यभराचं बंधन असतं. मात्र कल्याणमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने मुलीशी लग्न करण्यापूर्वी एका मुलाशी लग्न केल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. मुलाने घरच्यांनी शोधलेल्या मुलीशी लग्न केलं. सुरुवातीचे दिवस आनंदात गेले. त्यांच्या आयुष्याच्या वेलीवर एका चिमुकल्या मुलीच्या रुपाने फुलही उमललं. मात्र यानंतर समोर आलेल्या एका प्रकाराने त्याच्या पत्नीला मोठा धक्का बसला. कारण पतीचं आधीच एका मुलासोबत आधीच लग्न झालेलं असल्याचं तिला समजलं. काय आहे संपूर्ण प्रकरण? आयआयटीत शिकलेल्या कल्याणच्या एका तरुणाशी मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणीचं 2015 साली लग्न झालं. सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेल्यानंतर अचानक तिला तिचा नवरा समलैंगिक असल्याचं समजलं आणि तिथूनच तिला घरच्यांनी त्रासही देणं सुरू केलं. या लग्नाचे फोटोही या तरुणीला सापडले आणि ती आणखी हादरली. तरुणीला हा सगळा त्रास असह्य झाल्यावर माहेरी धाव घेतली. तिथून महिला तक्रार निवारण मंचाकडे तक्रार नोंदवण्यात आली. मात्र नवरा माघार घेण्यास किंवा तडजोड करण्यास तयार नसल्यानं सरतेशेवटी खडकपाडा पोलीस ठाण्यात या तरुणीनं फसवणुकीची तक्रार दाखल केली. हा सगळा प्रकार तरुणाच्या आई-वडिलांना आधीच माहित असल्याचा आरोपही यात करण्यात आला आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अद्याप हा तरुण किंवा त्याच्या आई वडिलांना अटक करण्यात आलेली नाही.
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















