एक्स्प्लोर

Ganeshotsav 2023: गणेशोत्सव मंडळांना टाटा देणार 'पॉवर'; निवासी दराने तात्पुरती वीज जोडणी देणार

Ganeshotsav : टाटा पॉवर किमान कागदपत्रांसह तात्पुरत्या स्वरुपात गणेश मंडळाना वीज जोडणी देतानाच निवासी शुल्क श्रेणीतील दर आकारणार आहे.

मुंबई :  गणेशोत्सवासाठी  (Ganeshotsav 2023) काही दिवसच उरले असून गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन टाटा पॉवरने केले आहे. अधिकृत कनेक्शन घेण्यासाठी टाटा पॉवरने मागील वर्षी आलेल्या अर्जांनुसार आधारित गणेशोत्सव मंडळाशी आधीच संपर्क साधला आहे. गेल्या वर्षी टाटा पॉवरने 180 गणेश मंडळांना नवीन कनेक्शन दिली होती. टाटा पॉवर किमान कागदपत्रांसह तात्पुरत्या स्वरुपात गणेश मंडळाना वीज जोडणी देतानाच निवासी शुल्क श्रेणीतील दर आकारणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना मोठा फायदा होणार आहे. टाटा पॉवर कंपनीकडून मुंबई उपनगरात वीज पुरवठा केला जातो. 

सार्वजिनक गणेशोत्सव मंडळे टाटा पॉवर ग्राहक पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या व्यतिरिक्त कस्टमर रिलेशन्स सेंटर्सकडे वैयक्तिकरित्या किंवा एलईसीद्वारे ओळखीचा पुरावा, मालकीचा पुरावा,  बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि इतर काही किमान कागदपत्रांसह संपर्क साधू शकतात. टाटा पॉवर विद्युत सुरक्षिततेशी संबंधित जागरूकता मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन करते. मागील वर्षी कंपनीने सर्व गणेश मंडळापर्यंत पोहोचून 150 हुन अधिक वीज ग्राहक सुरक्षिता जागरुकता सत्रे आयोजित केली होती. गणेश मंडळांना भेट देणाऱ्या सर्व भाविकांच्या सुरक्षेसाठी यावर्षीही अशाच प्रकारच्या उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती टाटा पॉवरच्यावतीने देण्यात आली. सणासुदीच्या काळात विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरक्षेबाबत जनजागृती करण्याची टाटा पॉवरची योजना आहे.

याबरोबरच टाटा पॉवरकडे एक मान्यताप्राप्त डीएसएम (DSM) प्रोग्राम आहे ज्याद्वारे कंपनी LED ट्यूब लाइट्स, BLDC पंखे आणि स्टार रेटेड एअर कंडिशनर्स सारखी ऊर्जा कार्यक्षम उपकरणे पुरविते . जे ग्राहक नवीन कनेक्शनसाठी अर्ज करतात त्यांना याबाबत माहिती देत असल्याचे कंपनीने म्हटले. गेल्या वर्षी आम्ही अशा प्रकारे 55 पेक्षा जास्त गणेश मंडळांमध्ये उत्पादने प्रदर्शित केली होती. या व्यतिरिक्त टाटा पॉवरने सामान्य जनतेला वापराचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी  आणि त्यासाठीचे सकारात्मक वातावरण निर्माण करतानाच त्यांना ग्रीन इलेक्ट्रिक वाहने घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ईव्ही चार्जर बसवले आहेत.

असा असेल वीज दर

युनिट /                 दर                                                             

0-100      3.34  रुपये प्रति युनिट                                              
101-300    5.89  रुपये प्रति युनिट                                                                            
301-500    9.34  रुपये प्रति युनिट                                                                      
500 हून अधिक 10.4रुपये प्रति युनिट                     

शासनाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक

गणेशोत्सव साजरा करताना स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभाग तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी कळवण्यात आलेल्या सूचना, नियम अथवा आदेशांचे सर्व गणेश मंडळांना पालन करणे बंधनकारक राहणार असणार आहे. उत्सव संपल्यानंतर सर्व गणेश मंडळांनी 3 दिवसांच्या आत स्वखर्चाने संबंधित मंडप, स्टेज कमान, रनिंग मंडप तसेच रस्त्यावरील देखावे, विटांमधील बांधकामे, देखाव्यातील मूर्ती आणि अन्य साहित्य रस्त्यांवरुन ताबडतोब हटवून घेणे तसेच रस्त्यावरील घेतलेले खड्डे स्वखर्चाने सिमेंट काँक्रिटमध्ये बुजवून मनपाची जागा सुस्थितीत करणे बंधनकारक राहिल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maha Shivratri : कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 February 2025Special Report Ujjwal Nikam | निकमांकडे वकीलपत्र, तरीही आरोपांचं सत्र;नियुक्तीवर देशमुख कुटुंब समाधानीSpecial Report | Uddhav Thackeray | ठाकरेंकडून शिंदेंना शिंगावर, फडणवीसांना डोक्यावर?Zero Hour | Swarget Bus Depo News | 'शिवशाही'त बलात्कार एसटीचं 'वस्रहरण',झीरो अवर शोमध्ये सखोल चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maha Shivratri : कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
Embed widget