एक्स्प्लोर

Ganeshotsav 2021 : गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत कलम 144 लागू; 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान जमावबंदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात गर्दी होऊ नये म्हणून मुंबईत  कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 10 ते 19  सप्टेंबर दरम्यान मुंबईत जमावबंदी असणार आहे.

मुंबई : गणपतीच्या आगमनाला फक्त काही तास  शिल्लक आहेत. या दरम्यान मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav 2021 ) काळात गर्दी होऊ नये म्हणून मुंबईत  कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 10 ते 19  सप्टेंबर दरम्यान मुंबईत जमावबंदी असणार आहे. मुंबई पोलिसांकडून या संदर्भातील सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

Ganeshotsav 2021 : गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज; मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई तर गणपती मंडळांसाठीसुद्धा नियम

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी सणासुदीच्या काळात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. गणोशोत्सव, नवरात्रोत्सवात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. कलम 144 नुसार  पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई पोलिसांनी एकूण 13 विशेष पथकं तयार केली आहेत. ज्यात 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 1 एपीआय, 2 पीएसआय असे 11 कॉन्स्टेबल असतील. मुंबईत एकूण 13 झोन आहेत आणि प्रत्येक झोनमध्ये एक पथक तैनात असेल.  झोनमध्ये कोरोनाचे नियम पाळले जात आहेत की, नाही यावर हे पथक लक्ष ठेवेल. जर कोरोनाचे नियम कुठेही पाळले जात नसतील, तर स्थानिक पोलीस त्यावर कारवाई करत आहेत की नाही.

सलग दुसऱ्या वर्षी मुख्य मंदिरामध्येच होणार 'दगडूशेठ'चा गणेशोत्सव, ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर

कोरोनाचे नियम  कुठेही पाळले जात आहेत की नाही? आणि स्थानिक पोलीस त्यावर कारवाई करत आहेत की, नाहीत? यावर लक्ष ठेवते आणि जर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली नाही, तर या विशेष पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल तसेच स्थानिक पोलिसांनी जर कारवाई केली नाही तर या विशेष पथकाद्वारे देण्यात आलेल्या रिपोर्टनुसार स्थानिक पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई करण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Vishakha Raut : उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget