Ganesh Immersion: मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
Ganesh Immersion: राज्याच्या गृह विभागाकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच एक आदेश जारी करण्यात आला होता.
Ganesh Immerssion: मुंबई : गणपती बाप्पांचे आगमन जेवढ्या उत्साहात आणि जल्लोषात झाले, तेवढ्याच भावूक वातावरणात आणि मोठ्या मिरवणुकीत गणरायाला (Ganeshotsav) आता निरोप देण्याची वेळ आली आहे. राजधानी मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुका ह्या देशभरात चर्चेत असतात. गणपती विसर्जनाच्यादिवशी मुंबईत सुट्टी असते, तसेच बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मुंबईत येतात. त्यामुळे, मुंबईत (Mumbai) विसर्जन मिरवणुकीला मोठी गर्दी होते, तसेच समुद्रठिकाणीही भाविकांचा जनसागर लोटलेला दिसून येतो. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस खबरदारी म्हणून उपाय करतात. त्यानुसार, काही मार्गावर वाहतूक बंद करण्यात येते. तर, काही धोकादायक पुलावरुन विसर्जन मिरवणुक जात असताना काही नियमावली घालून देण्यात येते. आता, मुंबई पोलिसांनी (Police) विसर्जन मिरवणुकांसाठी नियमावली आणि सूचना दिल्या आहेत.
राज्याच्या गृह विभागाकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच एक आदेश जारी करण्यात आला होता. त्यामध्ये, मुंबईतील काही मार्गावर वाहनांना, अवजड वाहनांना प्रवेशबंदी व पार्कींगसाठी मनाई करण्यात आली होती. आता, गणपती विसर्जन मिरवणुकीत भाविक आणि प्रेक्षकांची मोठी गर्दी असते. त्यातच, पादचारी आणि वाहनांच्या रहदारीत वाढ होते, जी अवजड वाहने आणि खाजगी बसेसच्या चालवण्यामुळे आणखी वाढू शकते. वाहतूकीला सुरळीत ठेवणे व गणपती विर्सजन मिरवणूकीला होणारा अडथळा होऊ नये म्हणून यापूर्वी अवजड वाहने आणि खाजगी बसेसवरील निर्बधांच्या अनुषंगाने निर्गमीत अधिसुचना तात्पुरत्या निलंबित करुन त्याऐवजी दिनांक 07 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या अवजड वाहने आणि खासगी बस यांबाबत खालील वाहतूक व्यवस्था करण्यात येत आहे.
अपर पोलीस आयुक्त, वाहतुक, वरळी, मुंबई, अधिसुवना/आदेश क. ११/कायम स्वरूपी / २०२४ / दि. २४/०१/२०२४ अन्वये बृहन्मुंबई मधील रस्त्यांवर सर्व प्रकारच्या अवजड वाहन व खाजगी बसेसना प्रवेश करण्यास व धावण्याकरीता वेळा निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
(१) वरील अधिसुचने अतिरीक्त संपुर्ण बृहन्मुंबईचे कार्यक्षेत्रासाठी सकाळी ११.०० ते दुस-या दिवशी सकाळी ०८.०० वाजेपर्यंत दक्षिण मुंबईमध्ये प्रवेश करण्यास व रस्त्यावर धावण्यास गणेशोत्सव काळात दिनांक ९,१२,१३,१४ व १८/०९/२०२४ या रोजी सदर निर्बध लागु राहतील.
(२) भाजीपाला, दूध, बेकरी उत्पादने, पिण्याचे पाणी, पेट्रोलियम उत्पादने, रुग्णवाहिका, सरकारी आणि निम शासकीय वाहने, आणि स्कूल बसेस यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांनाह अनुक्रमांक (१) यामध्ये केलेल्या निबंधांमधून सूट देण्यात येत आहे.
(३) मुंबईत प्रवेश आणि निर्गमन करणारी सर्व अवजड वाहने आणि प्रवाशांना घेऊन येणाऱ्या / जाणाऱ्या सर्व खाजगी बसेस तसेच उपरोक्त प्रमाणे सूट देण्यात आलेली सर्वह अवजड वाहने ही केवळ त्यांच्या खाजगी मालकीच्या जागेवर किंवा भाड्याने घेतलेल्या जागेवरच किंवा अधिकृत 'पे अँड पार्क' जागेवर पार्क केल्या जातील. अश्या सर्व वाहनांना कोणत्याही रस्त्यांवर 'ऑन-स्ट्रीट पार्किंग' करण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल.
मुंबई विसर्जन मिरवणुकीबाबत वाहतूक पोलिसांची अधिसूचना
जुन्या तशाच धोकादायक पुलावरून गणेश विसर्जन मिरवणूक निघताना खालील बाबींची काळजी घेण्यात यावी.
१) जुन्या तशाच धोकादायक पुलावरून १०० पेक्षा अधिक व्यक्ती विसर्जन मिरवणूकी वेळी जाणार नाहीत.
२) विसर्जन मिरवणूक जुन्या तसेच धोकादायक पुलावर थांबणार नाहीत.
३) पुलावर ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यात येवू नये तसेच नृत्य दिखील करू नये. वरील सुचना खालील नमूद पुलाबाबत लागू असतील
मध्य रल्वेवरील धोकादायक पूल
घाटकोपर रेल ओव्हर ब्रिज
करीरोड रेल ओव्हर ब्रिज
आर्थररोड रेल ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल ओव्हर ब्रिज
भायखळा रेल ओव्हर ब्रिज
मरिन लाईन्स रेल ओव्हर ब्रिज
पश्चिम रल्वे वरील धोकादायक पूल
सॅडहर्स्ट रोड रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये) फ्रेंच रेल ओव्हर ब्रीज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
केनडी रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
फॉकलन्ड रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये)
बेलासीस, मुंबई सेंट्रल स्टेशनच्या जवळ
महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर ब्रीज
प्रभादेवी- कॅरोल रेल ओव्हर ब्रीज
दादर टिळक रेल ओव्हर ब्रीज