एक्स्प्लोर

मुंबईत उभारणार बुर्ज खलिफापेक्षा उंच इमारत, नितीन गडकरींची माहिती

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये दुबईमधील जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा पेक्षाही उंच इमारत उभारण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पीटीआयला याबाबतची माहिती दिली. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेचा वापर करण्यात येणार असल्याचीही माहिती गडकरींनी दिली. गडकरींनी सांगितले की, ''मुंबईत आमच्या जहाज मंत्रालयाची सर्वात मोठी जमीन आहे. या जमीनीवरच ताज हॉटेल, बॅलार्ड इस्टेट, रिलायंस आदींच्या टोलेजंग आणि प्रशस्त इमारती आहेत. आम्ही मुंबई बंदराजवळची जमीन विकसित करण्यासाठी एक नवी योजना तयार केली आहे. त्याला केंद्र सरकारच्या मंजूरीची आम्ही वाट पाहात आहोत. जहाज मंत्रालयाची जमीन बिल्डर किंवा गुंतवणूकदारांना देणार नसल्याचं सांगून गडकरी पुढे म्हणाले की, ''आमच्याकडे हा परिसर विकसित करण्याची नवी योजना आहे. आम्ही या जागेवर एक ग्रीन आणि स्मार्ट रोड बनवणार आहोत. जो मरिन ड्राईव्हपेक्षा तिप्पट मोठा असेल. तसेच आम्हाला दुबईमधील बुर्ज खलिफापेक्षाही मोठी इमारत उभारायची आहे. यासाठी योजना तयार आहे, केवळ त्याला कॅबिनेटची मंजूरी मिळण्याची आम्ही वाट पाहात आहोत.'' देशातल्या सर्वात मोठ्या 12 बंदरांपैकी एक असलेल्या मुंबई बंदराची मालकी 1873 पासून मुंबई पोर्ट ट्रस्टकडे मालकी आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 500 हेक्टरवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. यात बंदराचं व्यवस्थापन, उद्योग, कॉर्पोरेट ऑफिस, किरकोळ बाजरपेठ, मनोरंजन आदींसोबतच कॉन्व्हेंशन सेंटर उभारले जाणार आहेत. या प्रकल्पातून माझगाव डॉक आणि वडाळा दरम्यान 7 किलोमीटर लांब मरिन ड्राईव्हसारखंच एक आकर्षण केंद्र उभारलं जाणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पात मनोरंजन केंद्र आणि सामुद्रिक संग्रहालय आदींचा समावेश असणार आहे. या जागेच्या विस्तारासाठी सल्लागार कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने या जागेच्या विकासाची रुपरेखा तयार करण्यासाठी आर. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल जहाज मंत्रालयाकडे सोपवला होता. या अहवालानुसारच हा नवा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. जहाज मंत्रालयाच्या वतीने देशातील इतरही बंदरांचा अशाच प्रकारे विकास करण्यात येणार असल्याची माहिती गडकरींनी यावेळी दिली. याबाबत गडकरी म्हणाले की, ''सध्या मंत्रालयाच्या मालकीची जवळपास एक लाख हेक्टर जमीन आहे. या जमीनींच्या विकासासाठी संसाधनांची कमतरता आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने बंदरांच्या विकासासाठी सागरमाला प्रकल्पाला 14 लाख कोटींची तरतूद केली आहे.''

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget