एक्स्प्लोर
सूचना की थट्टा?... मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर मूर्खपणाचा कळस
मुंबईतील काही रेल्वे स्थानकांच्या जिन्यावर अशा काही सूचना लावल्या आहेत की, त्यामुळे मुंबईकरही बुचकळ्यात पडले आहेत.

मुंबई : स्टेशनवरच्या पाट्या, रस्त्यांवरचे फलक आणि दुकानांमधल्या सूचना यावर एक विश्वकोष तयार होईल... पण विनोदी. कारण मुंबईमध्ये अशाच सूचनांनी लोकांना हसू अनावर झालं आहे. मुंबईतील काही रेल्वे स्थानकांच्या जिन्यावर अशा काही सूचना लावल्या आहेत की, त्यामुळे मुंबईकरही बुचकळ्यात पडले आहेत. 'कृपया लहान चेंडू घेऊ नका….’, मुंबईतल्या काही रेल्वे स्थानकांवरील जिन्यावरील पायऱ्यांवर हे वाक्य पाहायला मिळतं. पण या वाक्याचा नक्की अर्थ काय? 'please do not take short cuts' हे वाक्य तुम्ही गुगल ट्रान्सलेटमध्ये टाकलं तर मराठीत 'कृपया लहान चेंडू घेऊ नका….’ असा त्याचा अर्थ दाखवतं. म्हणजेच गुगलनं जसं भाषांतर करुन दिलं. त्याच भाषांतरातील ओळी जशाच्या तशा छापून त्याचे पोस्टर पायऱ्यांवर लावण्यात आले. हा सर्व प्रताप एका सामाजिक संस्थेनं केल्याची कुणकुणही लागली आहे.
फक्त हे एकच वाक्य नाही तर यासारखी गोंधळ उडवणारी दुसरीही वाक्यं जिन्यांवर लावण्यात आली आहे. 'कृपया घसरनारी बुटे वापरू नका…’ असं वाक्य छापलेलं पोस्टरही या जिन्यावर लावण्यात आलं आहे.
जो दुसऱ्यावरी विसावला त्याचा कार्यभार बुडाला. अशी एक म्हण आहे. पण आता जो गुगल ट्रान्सलेटवरी विसावला, त्याचा कार्यभार बुडाला. असंच म्हणावं लागेल. दरम्यान, हा सर्व प्रकार सुरु असताना रेल्वे प्रशासन नेमकं काय करत होतं. असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
फक्त हे एकच वाक्य नाही तर यासारखी गोंधळ उडवणारी दुसरीही वाक्यं जिन्यांवर लावण्यात आली आहे. 'कृपया घसरनारी बुटे वापरू नका…’ असं वाक्य छापलेलं पोस्टरही या जिन्यावर लावण्यात आलं आहे.
जो दुसऱ्यावरी विसावला त्याचा कार्यभार बुडाला. अशी एक म्हण आहे. पण आता जो गुगल ट्रान्सलेटवरी विसावला, त्याचा कार्यभार बुडाला. असंच म्हणावं लागेल. दरम्यान, हा सर्व प्रकार सुरु असताना रेल्वे प्रशासन नेमकं काय करत होतं. असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व























