एक्स्प्लोर
Advertisement
इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचा 350 फुटी पुतळा
मुंबई : इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. याबाबतचा अंतिम आराखडा मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
या आराखड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वात उंच अशा 350 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचा समावेश करण्यात आला आलाय. तसेच लायब्ररी, भिक्खू निवासस्थान, विपश्यना सभागृह, पार्किग, म्युझियम आदींचा या आराखड्यात समावेश आहे.
त्याचप्रमाणे अमेरिका आणि चीनच्या धर्तीवर 'सायक्लोरामा' या नवीन तंत्राचा वापर या स्मारकात करण्याचं प्रस्तावित करण्यात आलंय. यासाठी विशेष सभागृह बांधण्यात येणार असून तिथे प्रवेश केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सान्निध्यात असल्याचा भास होईल, असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement