एक्स्प्लोर
इमारतीचं गेट अंगावर पडल्याने चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

कल्याण : इमारतीचं गेट अंगावर पडल्याने चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण पूर्व भागात घडली आहे. हा चिमुरडा आणि त्याचे कुटुंबिय कल्याण परिसरातील भूमी कॉम्पेक्समध्ये राहतात.
शनिवारी सायंकाळी इमारतीबाहेर खेळत असताना दुरुस्तीसाठी काढून ठेवलेल्या लोखंडी गेटवर तो चढला आणि हे गेट त्याच्या अंगावर कोसळलं. यात त्याच्या तोंडाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.
यावेळी त्याला तातडीने जवळच्या एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. यानंतर रात्री उशिरा त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















