एक्स्प्लोर

CAG च्या विनोद राय यांचा माफीनामा; 2G आणि कोळसा घोटाळा बदनामी प्रकरणी संजय निरुपम यांची मागितली विनाशर्त माफी

विनोद राय (Vinod Rai)) यांनी त्यांच्या  2G (2G Scam) आणि कोळसा घोटाळ्यासंबंधित (Coal Scam) बनावट अहवालाबद्दल आता देशाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली आहे. 

मुंबई : देशात गाजलेल्या 2G आणि कोळसा घोटाळ्याप्रकरणी देशाचं राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. त्या प्रकरणी आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कॅगचे तत्कालीन प्रमुख विनोद राय (CAG Vinod Rai) यांनी त्या संबंधी बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupan) यांची विनाशर्त माफी मागितली आहे. विनोद राय यांनी त्यावेळी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय निरुपम यांचं नाव घेतलं होतं. त्यावर संजय निरुपम यांनी दिल्लीतील एका न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. 

संजय निरुपम यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन ही माहिती दिली असून विनोद राय यांनी त्यांच्या बनावट अहवालाप्रकरणी आता देशाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली आहे. संजय निरुपम यांनी म्हटलं आहे की, शेवटी कॅगचे माजी अध्यक्ष विनोद राय यांनी माझी विनाशर्त माफी मागितली आहे. त्यांच्या विरोधात मी नवी दिल्लीच्या पटियाळा येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात बदनामीचा दावा दाखल केला होता. विनोद राय यांनी त्यांच्या  2G आणि कोळसा घोटाळ्यासंबंधित बनावट अहवालाबद्दल आता देशाची माफी मागावी. 

 

काय आहे प्रकरण? 
कॅगचे तत्कालीन अध्यक्ष विनोद राय यांनी सप्टेंबर 2014 मध्ये अर्णब गोस्वामींना टाईम्स नाऊ या वाहिनीसाठी एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी संजय निरुपम यांचा त्यांच्या  2G आणि कोळसा घोटाळ्यामध्ये समावेश असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला मुलाखत देतानाही त्यांनी हेच वक्तव्य केलं होतं. ही मुलाखत इतरही वृत्तपत्रात छापून आली होती. त्यानंतर त्याच महिन्यात त्यांच्या 'नॉट जस्ट अॅन अकाऊंटंट: द डायरी ऑफ द नेशन्स कन्सायन्स कीपर' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या दरम्यान देखील यावर भाष्य केलं होतं. 

विनोद राय यांनी संजय निरुपम यांच्या विरोधात केलेलं वक्तव्य हे चुकीचं असल्याचं कबुल केलं आहे. त्यामुळे निरुपम आणि त्यांच्या कुटुंबियांना झालेल्या मानसिक त्रासासाठी विनाशर्त माफी मागितली आहे. 

संजय निरुपम हे आपला विनाशर्त माफीनामा स्वीकारतील आणि हा विषय या ठिकाणी संपवतील अशी आशा विनोद राय यांनी व्यक्त केली आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Embed widget