एक्स्प्लोर

Shivsena UBT Meeting : ओमराजे ते बंडू जाधव, तेच 5 खासदार ना ठाकरेंच्या बैठकीला आले, ना आदित्यच्या बर्थ डेला, कारणंही चकीत करणारी, ऑपरेशन टायगरवर शिक्का?

Shivsena UBT Meeting : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी (14 जून) मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते.

मुंबई :   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी (14 जून) मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. त काही खासदार ऑनलाईन उपस्थित होते. दरम्यान, जे पाच खासदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी अनुपस्थित तेच पाच खासदार आज उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीला देखील अनुपस्थित होते. प्रत्यक्षात ठाकरेंच्या शिवसेनेचे फक्त चार खासदार हे मातोश्रीवर बैठकीला उपस्थित होते. 

Shivsena UBT Meeting : एकीकडे ऑपरेशन टायगरच्या चर्चा अन्...

आज विविध कारणं देणारे पाच खासदार काल सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा अनुपस्थित राहिले ते खासदार आज सुद्धा बैठकीला अनुपस्थित होते. एकीकडे ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असताना त्यामुळे या पाच खासदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेपासून आणि प्रमुख नेत्यांपासून दुरावा कायम ठेवण्याचा विचार केला का? असा प्रश्न निर्माण होत आहे.कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहू नये, यासाठी आपण का आला नाहीत?  याचे स्पष्टीकरण द्यावे अशा सूचना उद्धव ठाकरेंनी अनुपस्थित राहिल्या खासदारांना दिल्या आहेत. पाच खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेत्यांनी सांगितलं. मात्र प्रत्यक्षात मीटिंग दरम्यान फक्त नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी उद्धव ठाकरेंचं बोलणं झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे इतर खासदाराने आपण का उपस्थित राहू शकलो नाहीत? याचे स्पष्टीकरण दिलं आहे. येत्या दोन दिवसात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी काही खासदारांना बोलावलं असल्याची माहिती आहे. 

हे खासदार मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार का? की ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरेंसोबतचा दुरावा कायम राहणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हे पाच खासदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा अनुपस्थित होते तेच पाच खासदार आज खासदारांच्या बैठकीला सुद्धा अनुपस्थित राहिल्यामुळं चर्चांना उधाण आले आहे. 

1) संजय जाधव परभणी 
2) संजय देशमुख वाशिम 
3) ओमराजे निंबाळकर - धाराशिव 
4) भाऊसाहेब वाकचौरे -शिर्डी 
5) नागेश पाटील आष्टीकर - हिंगोली

मुंबईतील खासदार वगळता मराठवाडा आणि विदर्भातील खासदारांची अनुपस्थिती आजच्या बैठकीत दिसून आली. मात्र, त्यावर आता स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा विधानपरिषदेची निवडणूक लढतोय, त्यामुळे ते ऑनलाईन होते. तर, संजय जाधव - फोनवरून उपस्थित होते. यवतमाळचे खासदार संजय देशमुखांच्या घरीही मुलीचं लग्न आहे, त्यामुळे ते देखील ऑनलाईन उपस्थित होते. तर, भाऊसाहेब वाकचौरे आणि खासदार ओमराजे कौटुंबिक कारणास्तव (मेडिकल) बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते, अशी माहिती संजय राऊत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. आम्ही दर महिन्याला रूटीन मिटिंग करत असतो, तेव्हा उद्धव ठाकरे मार्गदर्शन करत असतात. परत पुढल्या महिन्यात अशी बैठक होईल. आजच्या बैठकीला जे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत ते येत्या दोन-तीन दिवसांत स्वतः मातोश्रीवर  येतील, असेही राऊत यांनी सांगितले. 

Shivsena UBT Meeting : ऑपरेशन टायगरच्या चर्चेत तथ्य नाही - कैलास पाटील

ऑपरेशन टायगरच्या चर्चेत तथ्य वाटत नाही, लोकसभा निवडणुकीपासून कायम ही चर्चा होते. मुलाची तब्येत बरी नसल्याने खासदार ओमराजे निंबाळकर पक्षाच्या बैठकीला हजर नव्हते, त्यांनी तसं कळवलं ही होतं, असे म्हणत अंबादास दानवे यांच्या उपस्थितीतील बैठकीला देखील ओमराजे निंबाळकर अनुपस्थितीत होते, त्यावरुन गैरहजेरीवर आमदार कैलास पाटलांनी खुलासा केला आहे. तसेच, 2022 लाच आम्ही भूमिका ठरवली होती की, उद्धव ठाकरेंसोबत थांबायचं, असेही कैलास पाटलांनी स्पष्ट केलं.

Shivsena UBT Meeting : ऑनलाईन उपस्थित असलेले खासदार

अपरिहार्य कारणांमुळे जे खासदार प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत, त्यांनी ऑनलाईन हजेरी नोंदवली. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी): सकाळपासून वाकचौरे 'नॉट रिचेबल' असल्याच्या अफवा होत्या. मात्र, त्यांच्या पत्नी आजारी असल्याने ते मुंबईत येऊ शकले नाहीत. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने बैठकीत सहभाग घेतला.

Shivsena UBT Meeting : बैठकीबाबत संजय राऊतांनी दिली माहिती

मातोश्रीवरती झालेल्या खासदारांच्या बैठकीबाबतची माहिती पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करून दिली होती, यामध्ये राऊत यांनी म्हटलं होतं की, 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज 'मातोश्री'वर लोकसभेतील सर्व खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली बैठकीत अरविंद सावंत अनिल देसाई संजय दिना पाटील राजाभाऊ वाझे हे उपस्थित होते.शिवाय ओमराजे निंबाळकर भाऊसाहेब वाघचौरे नागेश आष्टीकर संजय देशमुख हे खासदार व्हर्चुअली उपस्थित होते संजय बंडू जाधव (परभणी) यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी फोनवर चर्चा केली, सर्व खासदार एकजूट आणि निष्ठेने शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे आहेत, बैठकीत श्री.आदित्य ठाकरे उपस्थित होते आता तरी अफवांचा बाजार बंद होईल ही अपेक्षा! जय महाराष्ट्र !'.

Shivsena UBT Meeting : उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन ऑफलाईन बैठकीत नेमके कोणते मुद्दे मांडले 

१. कर्जमाफी विरोधात आवाज उठवा... कर्जमाफी संदर्भात सरकारला प्रश्न विचारा..
2. सर्व खासदार आपल्या सोबत आहेत तुम्ही कोणाच्याही संपर्कात नाहीत... कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तो संभ्रम काही ठिकाणी दूर करा 
3. महागाई कर्जमाफी शेतकऱ्यांचे प्रश्न यावर आवाज उठवा...
4. जशी खासदारांची बैठक घेतली तशी आज जिल्हाप्रमुखांची सुद्धा झूम मीटिंग उद्धव ठाकरे घेणार आहेत 
5. जिल्ह्या जिल्ह्यातील प्रश्न त्या ठिकाणची समस्या जिल्हाप्रमुखांकडून उद्धव ठाकरे जाणून घेतील 
6. संघटनात्मक दृष्टिकोनातून सुद्धा उद्धव ठाकरेंनी आजच्या खासदारांच्या बैठकीत मार्गदर्शन केलं 
7. ज्या ठिकाणी खासदारांच्या संदर्भात संभ्रम आहे त्या ठिकाणी तो संभ्रम दूर करून आपण पक्षासोबत आहोत हे कार्यकर्त्यांना सांगा आपली भूमिका स्पष्ट करा असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी बैठकीत सांगितलं

 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
Mumbai Crime News: मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
Advertisement

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Embed widget