एक्स्प्लोर

कॉल डिटेल्स रेकॉर्डिंग लीक प्रकरणी महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक

प्रसिद्ध प्रायव्हेट डिटेक्टिव रजनी पंडित यांना ठाणे पोलिसांनी दादरमधून अटक केली आहे. त्यांच्यावर काही विशेष लोकांचे कॉल डिटेल्स रेकॉर्डस लीक केल्याचा आरोप आहे.

मुंबई : प्रसिद्ध प्रायव्हेट डिटेक्टिव रजनी पंडित यांना ठाणे पोलिसांनी दादरमधून अटक केली आहे. त्यांच्यावर काही विशेष लोकांचे कॉल डिटेल्स रेकॉर्डस लीक केल्याचा आरोप आहे. ठाणे पोलिसांनी याआधी चार डिटेक्टिवना अटक केली होती. त्यांच्या तपासातून रजनी पंडित यांचं नाव समोर आलं. दिल्लीच्या एका अज्ञात व्यक्तीला हाताशी धरुन कॉल डेटा रेकॉर्ड चोरायचा आणि तो लोकांना विकायचा असा धंदा ही टोळी करत होती, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी गुरुवारी संतोष पंडगळे आणि प्रशांत सोनावणे या गुप्तहेरांना अटक केली होती. त्यांच्याकडून 177 सीडीआर पोलिसांनी जप्त केल्या होत्यात. त्याच्या तपासादरम्यान शुक्रावारी रजनी पंडित यांना त्यांच्या दादर येथील घरातून अटक करण्यात आली.  रजनी यांनी 5 सीडीआर आरोपी समरेश ननटुन झा उर्फ प्रतीक मोहपाल यांच्या कडून विकत घेतल्याचा आरोप आहे. यासंदर्भात त्यांना अटक करून आता चौकशी सुरु आहे. त्यांच्या अटकेपाठिमागे आयपीएस लॉबीचा समावेश असण्याची शक्यता पोलीस वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे. येणाऱ्या काळात आणखीन काही अटक करण्यात येतील. कोण आहेत रजनी पंडित? भारताच्या पाहिल्या महिला डिटेक्टिव म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे वडील शांताराम पंडित पोलीस खत्यात होते. 1991 साली रजनी यांनी, डिटेक्टिव सर्व्हिस ही कंपनी सुरु करुन डिटेक्टिव म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धि मिळाली. त्यांच्या टीममध्ये 30 जण आहेत. जे महिन्याला 20 प्रकरणांचा सखोल तपास करुन, त्या प्रकरणाचा छडा लावतात. आतापर्यंत त्यांनी 75 हजार पेक्षा जास्त छडा लावला आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना 50 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये दूरदर्शनच्या हिरकणी पुरस्काराचा देखील समावेश आहे. दरम्यान, रजनी पंडित यांच्या कामगिरीनं प्रेरित होऊन त्यांच्यावर काही लघुपटही निघाले आहेत. तर रजनी यांच्या आयुष्यावरची एक तमिळ फिल्मही प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. पण त्यांच्या अटकेनं पोलीस, आणि हायप्रोफाईल वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Eknath Shinde On Maharashtra School: शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला आढावा घ्या; एकनाथ शिंदेंचे आमदार-खासदारांना आवाहन, दादा भुसेंसोबत 4 तास बैठक
शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला आढावा घ्या; एकनाथ शिंदेंचे आमदार-खासदारांना आवाहन, दादा भुसेंसोबत 4 तास बैठक
Bhuleshwarcha Raja Marathi News: मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
Embed widget