एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कर्जमाफीचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये पूर्ण करणार : मुख्यमंत्री
कर्जमाफीचे फॉर्म ऑगस्टमध्ये जमा करुन छाननी केली जाईल. त्यानंतर सप्टेंबरमध्ये कर्जमाफीचा पहिला टप्पा पूर्ण केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
मुंबई : कर्जमाफीचे फॉर्म ऑगस्टमध्ये जमा करुन छाननी केली जाईल. त्यानंतर सप्टेंबरमध्ये कर्जमाफीचा पहिला टप्पा पूर्ण केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्यातील शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची कर्जमाफी
राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. 24 जून रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना
राज्यातील सुमारे 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारी ही कर्जमाफी ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ म्हणून ओळखली जाणार आहे. या योजनेचा लाभ पीक कर्जासह मध्यम मुदतीच्या कर्जधारकांनाही होणार आहे.
दिनांक 1 एप्रिल 2012 ते 30 जून 2016 या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
‘यांना’ कर्जमाफीतून वगळलं!
राज्यातील आजी-माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी-माजी खासदार, आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, केंद्र आणि राज्य सरकारचे तसेच निमशासकीय संस्था आणि अनुदानित संस्थांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी या कर्जमाफीसाठी पात्र असणार नाहीत. करदाते आणि व्हॅट भरणारे व्यापाऱ्यांनाही कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
शेतकरी कर्जमाफी योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भराल?
कर्जमाफी 34 हजार कोटींची, जाहिरातबाजी 36 लाखांची!
मुंबईतील 813 शेतकऱ्यांसह राज्यातील कर्जमाफी लाभार्थ्यांची आकडेवारी जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement