एक्स्प्लोर
मुंबईत पहिलं तरंगतं हॉटेल, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन
मुंबई : मुंबईत पहिल्यांदाच तरंगतं हॉटेल सुरु करण्यात आलं आहे. वांद्रे रेक्लमेशन जवळ ए. बी. सेलेस्टीयन या खाजगी कंपनीनं हे हॉटेल सुरु केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी या तरंगत्या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं.
गोव्यातील संकल्पनेप्रमाणे मुंबईतही पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशानं एमटीडीसीच्या सहकार्यानं हे हॉटेल सुरु करण्यात आलं आहे. गेट वे, बोरीवली, बेलापूर अशा मुंबईच्या किनाऱ्यावर ही बोट फिरत राहणार आहे.
या हॉटेलचं उद्घाटन 2014 मध्ये छगन भुजळांच्या हस्ते करण्यात येणार होतं. मात्र काही परवानग्या रखडल्यानं हे हॉटेल सुरु करण्यात आलं नव्हतं. संकल्पना वेगळी असल्यामुळे 108 परवानग्या घ्याव्या लागल्याने उशीर झाल्याचं हॉटेल मालक सांगतात. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत असे आणखी दोन फ्लोटल करायचे आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
Advertisement