एक्स्प्लोर
मुंबईतील फोर्टमध्ये व्यावसायिक इमारतीला आग, तिसरा मजला खाक
मुंबई : मुंबईतील फोर्ट परिसरातील जे. के. सोमाणी या पाच मजली व्यावसायिक इमारतीला आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही.
बुधवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. त्यातच सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग आणखीच भडकली. पहाटे चार वाजेपर्यंत ही आग धुमसत होती. एसी रिपेअरिंगचे काम सुरू असताना ही आग लागली असल्याचं प्रत्यक्षदर्शींच म्हणणं आहे.
आगीमुळे इमारतीमधील शेअर ब्रोकर, वकील यांची कार्यालयं जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या चार आणि पाण्याच्या तीन गाड्यांच्या मदतीने पहाटे आगीवर नियंत्रण मिळवलं. पण तोपर्यंत या कार्यालयांमधील कागदपत्रांची राख झाली होती. तसंच पाण्यामुळेही अनेक कागदपत्रे खराब झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement