एक्स्प्लोर

Mumbai Fire : मरीन ड्राईव्हवरील ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीला आग, वरच्या मजल्यावरून धुराचे लोट; आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

Mumbai Fire : मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीला आग, वरच्या मजल्यावरून धुराचे लोट; आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

Mumbai Trident Building Fire : मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलच्या (Trident Hotel) इमारतीला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मरीन ड्राईव्ह येथील ट्रायडंट हॉटेलच्या (Hotel Trident Fire) इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावरून धुराचे लोळ पाहायला मिळाले. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रायडंट हॉटेलच्या इमारतीच्या टेरेसवरून धुराचे लोळ बाहेर पडताना दिसून आले. 

हॉटेल ट्रायडेंटच्या इमारतीला आग

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे 6:50 ते 7:10 च्या दरम्यान मरीन लाईन्सवरील हॉटेल ट्रायडेंटच्या टेरेसवर मजल्यावरून काळा धूर यायला सुरुवात झाली. रविवार असल्याने मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग अॅक्टिव्हीटीसाठी नागरिक जमले होते. पहाटे हॅप्पी स्ट्रीट उपक्रमासाठी येथे जमलेल्या लोकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे दृश्य टिपायला सुरुवात केली. मात्र काही वेळात हा धूर येणं थांबल्याने नक्की ट्रायडेंटमध्ये काय झालं होतं हे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पंचतारांकित हॉटेलमधील आग आटोक्यात

मुंबईच्या दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये सकाळी सात वाजेच्या सुमारात आग लागली. दरम्यान, मुंबईतील पंचतारांकित हॉटेल ट्रायडंटला लागलेली आग आता आटोक्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमधील अंतर्गत अग्निसुरक्षा यंत्रणेद्वारेच हॉटेलमधील आग विझवण्यात आली आहे. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. हॉटेल ट्रायडंटला लागलेल्या आगीचा तपास मुंबई अग्निशमन दल करत आहे.

आगी संदर्भात हॉटेल ट्रायडंटचं स्पष्टीकरण

मुंबईतील पंचतारांकित हॉटेल ट्रायडेंटमध्ये आज सकाळी सातच्या सुमारास हॉटेलचा चिमणीमध्ये आग लागली होती. आगीची माहिती मिळताच ट्रायडेंट हॉटेलच्या आतमध्ये असलेला फायर सिस्टममधून हॉटेल कर्मचाऱ्यांनी आग विझवली आहे. मात्र या आगीसंदर्भात ट्रायडेंट हॉटेल प्रशासनाने माहिती देताना मॉक ड्रिल केल्याचं सांगितलं आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा तीन गाड्या हॉटेल ट्रायडेंटमध्ये दाखल होऊन आग कशामुळे लागली होती या संदर्भात अधिक तपास करण्यात येत आहे.

ट्रायडेंट हॉटेलबाबत अग्निशमन दलानं काय म्हटलं?

हॉटेल ट्रायडंटने याबाबत माहिती देताना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, हायराईज हॉटेलच्या इमारतीच्या 2 बेसमेंट प्लस ग्राउंडवरच्या 34 मजल्याच्या तळघरात ठेवलेल्या ट्यूब बॉयलरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे इमारतीच्या छतावरील चिमणीतून धूर निघत होता, असं हॉटेलने सांगितलं आहे. मरीन ड्राईव्हवरील पादचाऱ्यांनी सकाळी 7 वाजता आगसृश्य परिस्थिती दिसली. पण अग्निशमन दलाकडून घटनास्थळी जाऊन तपास करण्यात आला. ट्रायडंट हॉटेल प्राधिकरणासह परिसराचीही अग्निशमन दलाकडून कसून तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, हॉटेलच्या इमारतीला आग लागली नव्हती, असं अग्निशमन दलाने स्पष्टीकरण दिलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
Embed widget