एक्स्प्लोर
पालिका अभियंत्यांना मारहाण, राष्ट्रवादीच्या नगरसेविकेविरोधात गुन्हा

मुंबई : मुंबईच्या एलफिन्सटनमध्ये राष्ट्रवादी नगरसेविका रत्ना महाले आणि कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या अभियंत्यांना धक्काबुक्की केली. याविरोधात महाले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जी दक्षिण विभागातील अनधिकृत झेंडे, फ्लेक्स हटवण्यावरुन अभियंते आणि नगरसेविकेत शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास हा वाद झाला. फ्लेक्स आणि झेंडे हटवले म्हणून महाले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप पालिकेचे कनिष्ठ अभियंता रवी गुप्ता यांनी केला आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिस स्टेशनमध्ये रत्ना महाले आणि कार्यकर्त्यांविरोधात कलम 143,149,332,353,504 अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ जी दक्षिण विभागाच्या महापालिका कार्यालयात म्युनिसिपल मजदूर संघ आणि म्युनिसिपल इंजीनिअर्स असोसिएशन बंद पाळणार आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ जी दक्षिण विभागाच्या महापालिका कार्यालयात म्युनिसिपल मजदूर संघ आणि म्युनिसिपल इंजीनिअर्स असोसिएशन बंद पाळणार आहे. आणखी वाचा























