एक्स्प्लोर
परवानगीविना मनसेचा मोर्चा, आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल
मोर्चा काढून सार्वजनिक रहदारीस अडथळा केल्याचा आणि जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याचा गुन्हा पोलिसांनी मनसेच्या आयोजकांविरुद्ध नोंदवला आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मुंबईत रेल्वे प्रशासनाविरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर, राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यासाठीच मनसेने आज मुंबईत संताप मोर्चाचं आयोजन केलं होतं.
मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या निषेधार्थ राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मनसेने आज ‘संताप मोर्चा’चं आयोजन केलं होतं. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट असा भव्य मोर्चा काढून राज ठाकरे यांनी आपलं निवेदन रेल्वे प्रशासनाला दिलं. यानंतर राज ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केलं. मात्र, आता या मोर्चाच्या आयोजकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांची कायदेशीर परवानगी न घेता 'रेल्वे प्रशासनाचा धिक्कार असो, रेल्वे प्रशासन मुर्दाबाद' अशी घोषणाबाजी करून मेट्रो सिनेमा चौक ते चर्चगेट असा पायी मोर्चा काढून सार्वजनिक रहदारीस अडथळा केल्याचा आणि जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याचा गुन्हा पोलिसांनी मनसेच्या आयोजकांविरुद्ध नोंदवला आहे. त्यामुळे आता मनसे याबाबत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, आजच्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनासह भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. रेल्वे स्टेशन परिसरातले फेरीवाले येत्या 15 दिवसात हटवले नाही, तर मनसे रस्त्यावर उतरुन मनसे स्टाईलनं फेरीवाल्यांना हटवेल असा इशारा राज यांनी यावेळी दिला. संबंधित बातम्या : 15 दिवसात फेरीवाले हटवा, अन्यथा 16 व्या दिवशी आम्ही हटवू : राज ठाकरे
आणखी वाचा























