एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महिलांविषयी बेताल वक्तव्य, राम कदमांविरोधात अदखलपात्र गुन्हा
मुंबईतील घाटकोपर आणि सोलापुरातील बार्शीमध्ये राम कदमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : महिलांविषयी बेताल वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार राम कदम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील घाटकोपर आणि सोलापुरातील बार्शीमध्ये राम कदमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घाटकोपरमध्ये राम कदम यांच्यावर कलम 504 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये कलम 405, 505 ब नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, राम कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आपलं ठिय्या आंदोलन मागे घेतलं आहे. कदम यांच्यावर गुन्हा तर दाखल करण्यात आला, मात्र आता पोलिस काय कारवाई करतात याकडे महिलावर्गासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य
"कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले होते.
राम कदम यांचा माफीनामा
दहीहंडी उत्सवात महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांनी अखेर माफी मागितली आहे. राम कदम यांनी ट्विटरवर आपला माफीनामा सादर केला आहे. माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. राम कदम यांनी लिहिलं आहे की, "माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली. झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुन:श्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे."
महिला आयोगाकडून दखल
राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याची महिला आयोगाकडून स्वाधिकारे दखल घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्युमोटो दाखल करुन घेतली असून आठ दिवसात आपली बाजू मांडण्याचे आदेश राम कदम यांना दिले आहेत.
वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाहिन्यांमधून या वक्तव्याचं वार्तांकन झालं होतं. महिला आयोगाने त्याची स्वतःहून दखल घेतली आणि आठ दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले.
महिलांविषयक वक्तव्य करताना आमदार कदम यांनी काळजी घ्यायला हवी होती, अशी टिप्पणी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी यापूर्वीच केली होती. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने कदम यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलं आहे.
संबंधित बातम्या
..तर मुलीला पळवून आणण्यास मदत करेन: आमदार राम कदम
बेताल वक्तव्याप्रकरणी राम कदम यांचा माफीनामा
धाडस दाखवा, राम कदमांवर कारवाई करा, उद्धव यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
राम कदम पहिलेच नाहीत, भाजपच्या वाचाळवीरांची यादी मोठी
प्राची देसाईच्या डायलॉगसाठी राम कदमांनी गोविंदांना उतरवलं!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement