बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन: चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीला NCB ची अटक
छापेमारी दरम्यान एनसीबीच्या पथकाने फिरोजच्या घरातून ड्रग्ज जप्त केले. आता एनसीबी लवकरच नाडियाडवाला यांना चौकशीसाठी समन्स पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीला एनसीबीने अटक केली आहे. मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर बनखेडे यांनी ही माहिती दिली.
यापूर्वी छाप्यात एनसीबीच्या पथकाने फिरोजच्या घरातून ड्रग्ज जप्त केले होते. बॉलिवूडमध्ये पसरलेल्या ड्रग्जचं जाळं आज चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्यापर्यंत पोहचलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिरोज नाडियाडवाला यांच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आली आहेत. लवकरच एनसीबी चौकशीसाठी फिरोजला समन्स पाठवेल, अशी शक्यता आहे.
Film producer Firoz Nadiadwala's wife has been arrested today: Sameer Wankhede, Zonal Director of the Narcotics Control Bureau, Mumbai, on a drug-related case pic.twitter.com/jOhYmONtHF
— ANI (@ANI) November 8, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, फिरोजच्या घरी एनसीबीच्या सर्च ऑपरेशनमध्ये दहा ग्रॅम गांजा, तीन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर बनखेडे यांच्या नेतृत्वात एनसीबी मुंबईच्या पथकाने काल मुंबईतील पाच ठिकाणी छापा टाकला.
हा रेड ड्रग्ज पॅडलर्स आणि सप्लायरची धरपकड करण्यासाठी टाकली आहे. यात सुमारे 4 ते 5 ड्रग पॅडलर्स सप्लायर्सला ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आलं असून त्यात गांजा चरससह आणखी एक औषध जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर रोकडसह वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
NCB raids in Mumbai | बॉलिवूडच्या बड्या निर्मात्याच्या घरी एनसीबीची छापेमारी