एक्स्प्लोर
सततच्या रडण्याचा वैताग, आईने बाळाला पाण्यात बुडवून मारलं
सहा महिन्यांच्या बाळाला पाण्यात बुडवून मारणाऱ्या आरोपी आईला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

प्रातिनिधीक फोटो
भिवंडी : मुलाच्या रडण्यामुळे कंटाळलेल्या आईने थेट त्याचा जीव घेतला. सहा महिन्यांच्या बाळाला पाण्यात बुडवून मारणाऱ्या आरोपी आईला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भिवंडी तालुक्यातील कोलिवली कवाड भागात ही घटना घडली आहे. 25 वर्षीय कल्पना निलेश गायकर असं आरोपी महिलेचं नाव आहे. कल्पनाचा सहा महिन्यांचा मुलगा ऋषभ सारखा आजारी पडायचा. बरं नसल्यामुळे तो सतत रडत असायचा. बाळंतपणानंतर कल्पनाची प्रकृतीही ठीक नसायची. त्यामुळे वैतागून तिने बाळाला नाल्यातील पाण्यात बुडवलं. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचं कल्पनाने भासवलं. मात्र भिवंडी पोलिसांनी बाळाच्या मृत्यूचं गूढ उकलून तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























