एक्स्प्लोर
Advertisement
आधी मारहाण, मग बाथरुममध्ये कोंडलं, फॅशन डिझायनर आईचा मृत्यू
सुनिता फॅशन डिझायनिंग करत होत्या, तर लक्ष्यचं मॉडेलिंग सुरु होतं. मात्र त्यांच्यात पैशांवरुन सतत वाद होत असत.
मुंबई: अंधेरीतील पॉश परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोखंडवाला इथं मुलानेच आईची हत्या केल्याचा आरोप आहे. महत्त्वाचं म्हणजे मुलगा मॉडेलिंग करतो, तर आई फॅशन डिझायनर होती. पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
सुनिता सिंह असं मृत फॅशन डिझायनरचं नाव आहे. सुनिता या आपला मुलगा लक्ष्यसोबत लोखंडवाला परिसरातील क्रॉस गेट सोसायटीत भाड्याने राहात होत्या. त्यांच्यासोबत लक्ष्यची गर्लफ्रेंडही राहात होती.
सुनिता फॅशन डिझायनिंग करत होत्या, तर लक्ष्यचं मॉडेलिंग सुरु होतं. मात्र त्यांच्यात पैशांवरुन सतत वाद होत असत.
आई आणि मुलगा दोघांनाही ड्रग्जचं व्यसन असल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री ड्रग्ज घेतल्यानंतर त्या दोघांमध्ये पैशावरुन वाद झाले. लक्ष्यने रागाच्या भरात आईला मारहाण केली आणि बाथरुममध्ये ढकलून बाहेरुन दरवाजा बंद केला. त्यावेळी सुनिता यांना दुखापत झाली होती. सकाळी दरवाजा उघडला तेव्हा सुनिता यांचा मृतदेहच आढळला.
आईचा मृतदेह पाहून लक्ष्य घाबरला आणि त्याने अॅम्ब्युलन्स बोलावली. मात्र अॅम्ब्युलन्समधील पथकाने मृतदेह नेण्यास नकार दिला. मग लक्ष्य 2 तास जवळच्या एका मंदिरात जाऊन बसला. त्यानंतर लक्ष्यने पोलिसांना बोलावलं आणि तो नैसर्गिक मृत्यू असल्याचं सांगू लागला.
पण पोलिसांनी हत्येच्या अनुषंगाने तपास केला. त्यानंतर लक्ष्यने सर्व पार्श्वभूमी सांगितली. मग ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
महाराष्ट्र
करमणूक
विश्व
Advertisement