एक्स्प्लोर
मुंबई : नालासोपाऱ्यातील बिल्डरची घरात घुसून हत्या
![मुंबई : नालासोपाऱ्यातील बिल्डरची घरात घुसून हत्या Famous Construcrion Businessman Got Killled In Nalasopara मुंबई : नालासोपाऱ्यातील बिल्डरची घरात घुसून हत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/04165206/nalasopara-builder-ali.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईतील नालासोपारा परिसरात एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. अली असगर भानपुरवाला असं या व्यावसायिकाचं नाव आहे. आज सकाळी जोगेश्वरीतील ओशिवरामध्ये राहत्या घरी ही हत्या करण्यात आली.
नालासोपाऱ्यातील प्रसिद्ध रिलायबल या बांधकाम कंपनीचे भानपूरवाला मालक आहेत. आज सकाळी 2 वाजण्याच्या सुमारास आरोपी बुरखा घालून त्यांच्या घरात घुसला. आरोपीनं भानपूरवाला आणि त्याच्या पत्नीवर हल्ला केला. यात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे, तर भानपूरवाला यांचा हॉस्पिटलमध्ये नेताना मृत्यू झाला.
दरम्यान हत्या करणारा आरोपी बांधकाम व्यावसायिकाच्या पत्नीचा पहिला पती असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाला आहे. पोलीस आणि क्राईम बँच आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
विश्व
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)