एक्स्प्लोर

निवृत्त नौदल अधिकाऱ्याला बेदम मारहाण, शिवसेना कार्यकर्त्यांना अटक, भाजपची टीका

शिवसेना कार्यकर्त्यांनी एका निवृत्त नौसेना अधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार काल घडला आहे. सहा जणांना तात्काळ अटक देखील करण्यात आली आहे. ही घटना अत्यंत निषेधार्ह असून गुंडाराज थांबवा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुंबई : मुंबईत आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना आता शिवसेना कार्यकर्त्यांनी एका निवृत्त नौसेना अधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार काल घडला आहे. कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये मदन शर्मा हे निवृत्त नौसेना अधिकारी राहतात. काल त्यांनी महानगर 1 नामक एका व्हॉट्सअॅप ग्रुप वर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्या पोस्टमुळे नाराज शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांचे घर गाठले आणि त्यांना बेदम मारहाण केली.

या प्रकरणी समता नगर पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आणि त्यांना तात्काळ अटक देखील करण्यात आली आहे. कमलेश कदम, संजय मांजरे, राकेश बेळणेकर, प्रताप सुंदवेरा, सुनिल देसाई, राकेश मुळीक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुंडाराज थांबवा, भाजपची टीका या प्रकरणी विविध राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत असून यामुळे पुन्हा मुंबई मध्ये राजकीय युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. ही घटना अत्यंत निषेधार्ह असून गुंडाराज थांबवा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावर अभिनेत्री कंगना रनौतने देखील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. कंगना म्हटलं आहे की, एका माजी सैनिकाला अशा पद्धतीनं बेदम मारहाण केली. झुंडीनं केलेली मारहाण निषेधार्ह आहे. त्या व्यक्तीची चूक एवढीच होती की त्याने सरकार विरोधात कमेंट केली. या प्रकरणात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा, असं कंगनानं म्हटलंय.

यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार अतुल भातखळकर यांनी देखील व्हिडीओ ट्वीट करत निषेध व्यक्त केला आहे.

भाजप नेत्यांना आता लोकशाही आठवते - काँग्रेस दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की, माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्यांवर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने कारवाई केली. पण ज्या भाजप नेत्यांना आता लोकशाही आठवते त्यांना आठवण करून दिली पाहिजे की फडणवीस परिवाराचा फोटो ट्विट केला म्हणून अजय हातेकरला पोलिसांनी अटक केली होती. दांभिक भाजपा!, असं सावंत यांनी म्हटलं आहे.

नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी भारतीय दंडविधान कलम 325 आणि दंगलीशी संबंधित तरतुदींअंतर्गत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करण्यात आली. परंतु त्यानंतर अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांची जामीनावर सुटका झाली. यावरुन भाजप आक्रमक झाली. जी कलम लावण्याची गरज होती ती न लावल्याने आरोपींची सुटका झाली. यावरुनच पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचं दिसतं असा आरोप करत भाजपने सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं.

भाजपचं ठिय्या आंदोलन मारहाण करणाऱ्यांविरोधात कलम 326 आणि 452 कलम लावण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली. यानंतरच्या त्यांच्या कार्यालयाबाहेर भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्त्वाच ठिय्या आंदोलन केलं. यानंतर विश्वास नांगरे पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा या संदर्भातील कलमांबाबत अभ्यास करुन पुढील कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. तसंच पोलिसांवर सरकारचा दबाव नसल्याचं सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

सहपोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित यादरम्यानच प्रवीण दरेकर यांनी फोनवरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केल्यानंतर आजचं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय भाजपने घेतला. मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. तर निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी करत राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  1 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर आम्हाही तीच भाषा करू - नवनीत राणाDevendra Fadnavis : स्ट्राईक रेट आणि जागांवर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Embed widget