एक्स्प्लोर

Aarey : आरेसाठी पुन्हा एकदा संघर्ष, मेट्रो कारशेड विरोधात पर्यावरणवाद्यांची आंदोलनाची हाक

Mumbai Metro Car Shed : मुंबई मेट्रो कारशेड आरेमध्येच बनवण्याच्या सरकारच्या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी मोठा विरोध दर्शवला असून रविवारी आंदोलनाची हाक दिली आहे.

Mumbai Metro Car Shed : मुंबईतील मेट्रो कारशेड आरेतच (Aarey Colony) बनवण्याचा निर्णय नवनिर्वाचित शिंदे सरकारनं घेतला आहे. या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी मोठा विरोध दर्शवला आहे. आज आरे जंगलातील मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणवाद्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. पर्यावरणवादी संघटनांनी रविवारी सकाळी सर्व पर्यावरणवादी आणि संघटनांना जमण्याचं आवाहन केलं आहे. आरे वनक्षेत्रात पर्यावरणवादी संघटनांकडून आंदोलन केलं जाणार आहे. पर्यावरणवाद्यांनी शांततापूर्ण आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. 

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा मेट्रो कारशेडच्या स्थलांतराचा निर्णय बदलून कारशेड आरेतच करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरे कारशेडविरोधात पर्यावरणवादी पुन्हा एकवटणार आहेत. पर्यावरणप्रेमींनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनीही आरेबाबतच्या निर्णयावर सरकारला पुन्हा एकदा विचार करण्याची विनंती केली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे देखील आरे बचाव मोहमेसाठी मैदानात उतरले आहेत. 'आरे' कारशेडबाबत 'नव्या उपमुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार करावा', अशी मागणी करणारी पोस्ट अमित ठाकरेंनी केली होती.

शिंदे सरकारनं आल्या आल्या 'आरे'मध्येच मेट्रो कार शेड होणार असल्याचं राज्याच्या अॅडव्होकेट जनरल यांना कळवलं आहे. आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने राज्याच्या महाधिवक्ता यांना दिले आहेत.   मेट्रो कारशेड हे आरेमधून कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता. यावरुन मोठा गदारोळ देखील झाला होता. आरेमधील मेट्रो शेड विरोधात नागरिक देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे कारशेड कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेतला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं
उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं
Maharashtra Rain Weather Updates: राज्यात पाऊस सर्वदूर, पण 3 दिवसांनी हवामान बदलणार; IMD चे अधिकारी सानप काय काय म्हणाले?, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
राज्यात पाऊस सर्वदूर, पण 3 दिवसांनी हवामान बदलणार; IMD चे अधिकारी सानप काय काय म्हणाले?, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case :
"तो खूप साधा, मनमिळाऊ होता, केतनच्या स्वप्नातील लग्नासाठी..." केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर वेडिंग प्लॅनरही हळहळले; सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली
वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही
वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही
उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं
उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं
Prashant Kishor: बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
धक्कादायक! मित्राच्या 1.5 लाख रुपयांसाठी जामीन राहिला; खासगी सावकाराने सव्वा कोटीची जमीन घेतली, अजूनही 70 लाखांची मागणी
धक्कादायक! मित्राच्या 1.5 लाख रुपयांसाठी जामीन राहिला; खासगी सावकाराने सव्वा कोटीची जमीन घेतली, अजूनही 70 लाखांची मागणी
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
Nagpur Crime News : एसटी महामंडळाची ई-बस चोरली; चार्जिंग संपली अन्...गेम झाला, एका चीपमुळं सापडलं 20 गुन्हे असलेल्या तेलंगणाच्या चोराच लोकेशन
एसटी महामंडळाची ई-बस चोरली; चार्जिंग संपली अन्...गेम झाला, एका चीपमुळं सापडलं 20 गुन्हे असलेल्या तेलंगणाच्या चोराच लोकेशन
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
Embed widget