एक्स्प्लोर

Amit Thackeray : 'आरे'च्या मुद्द्यावर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं एकमत, कारशेडबाबत पुनर्विचार करण्याची मागणी

एकीकडे राज ठाकरे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देत आहे तर दुसरीकडे त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी शिंदे सरकारच्या पहिल्याच निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. 'आरे'च्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोन ठाकरे भावांमध्ये एकमत असल्याचं पाहायला मिळतंय.

Aarey Metro Car Shed : आरे कारशेडविरोधात  पर्यावरणवादी पुन्हा एकवटणार आहे.  पर्यवरणप्रेमींनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे.  त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे देखील आरे बचाव मोहमेसाठी मैदानात आले आहे. 'आरे' कारशेडबाबत 'नव्या उपमुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार करावा', अशी मागणी करणारी पोस्ट अमित ठाकरेंनी केली आहे.

अमित ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुणांनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं . आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊ नका. पर्यावरण उद्ध्वस्त झालं  तर भविष्यात राजकारण करायला माणूस राहणार नाही.

एकीकडे राज ठाकरे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना शुभेच्छा देत आहे तर दुसरीकडे त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी शिंदे सरकारच्या पहिल्याच निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. 'आरे'च्या  मुद्द्यावर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोन ठाकरे भावांमध्ये  एकमत असल्याचं पाहायला मिळतंय. 

मुंबईतल्या आरे कॉलनीमधल्या जंगलावरून पर्यावरणप्रेमींबरोबर मनसेचाही विरोधी सुरू झाला आहे. तर उद्धव ठाकरेंनीही नव्या सरकारच्या आरे संदर्भातील निर्णयाचा विरोध केला आहे. 2019 साली एका रात्रीत 'आरे'मध्ये मेट्रो कारशेडच्या बांधणीसाठी 2700 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. झाडांची कत्तल करण्यास रात्रीच्या काळोखाचा आधार घेण्यात आला होता. सामान्य जनतेला आणि पर्यावरणप्रेमींना ही बाब लक्षात येताच त्यांनी 'आरे'कडे धाव घेतली आणि मोठं जनआंदोलन झाले होते. त्यामुळे आता पुन्हा आरे वाचवण्यासाठी मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.  

संबंधित बातम्या :

Aarey Metro Car Shed : 'आरे'तच मेट्रो कारशेड होणार? सध्या काय आहे कारशेडची स्थिती...

महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget