एक्स्प्लोर

मुंबई विद्यापीठात इंजिनिअरिंग पेपर स्कॅमचा पर्दाफाश

मुंबई: मुंबई पोलिसांनी मुंबई विद्यापीठातील इंजिनिअरिंग पेपर स्कॅमचा पर्दाफाश केला आहे. मुलांना पेपर सोडवण्यासाठी मदत करणाऱ्या 4 कारकून, 3 शिपाई आणि एका अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.   बऱ्याच वेळेला विद्यार्थी इंजिनिअरिंगचे पेपर उत्तर येत नसल्याने कोरे सोडून देतात. अटक केलेले आरोपी विद्यापीठातले पेपर आपल्या घरी घेऊन जायचे आणि काही पैशांच्या मोबादल्यात कोऱ्या पेपरवर उत्तर लिहून विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी मदत करायचे.   पण अखेर या प्रकरणाची कुणकुण लागताच मुंबई पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.   92 उत्तरपत्रिका जप्त   या रॅकेटचा पर्दाफाश केल्यामुळे विद्यापीठ आणि शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरोपींकडून 92 उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत.   मुंबई विद्यापीठात काही विद्यार्थी उत्तरपत्रिका बाहेर आणून सोडवत असल्याची माहिती माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली. पोलिसांनी आधी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांवर डोळा ठेवून त्यांना अटक केली आणिर याप्रकाराचा भांडाफोड झाला.   कर्मचाऱ्यांची टोळी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन हे रॅकेट चालवत असल्याचं उघड झालं.   कोरा पेपर पुन्हा सोडवण्याचा फंडा   शिपाई आणि कर्मचारी परीक्षेवेळी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून पैसे घ्यायचे. त्यानंतर विद्यार्थी पेपरला केवळ हजेरी लावून, उत्तरपत्रिका कोरी सोडून जायचे. त्यावेळी पैसे घेतलेले कर्मचारी विद्यार्थ्यांकडून हॉलतिकीट घ्यायचे. मग पेपर संपलेल्या रात्री त्या विद्यार्थ्याचा पेपर बाहेर काढायचे, संबंधित विद्यार्थ्याला बोलावून त्याला गुपचूप परत पेपर द्यायचे.   इतकंच नाही तर विद्यार्थी हा पेपर घरी घेऊन जायचे आणि दुसऱ्या दिवशी याच उत्तरपत्रिका विद्यापीठात जमा केल्या जात, अशी माहिती पोलिसांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
Embed widget