एक्स्प्लोर
Advertisement
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : महिलेच्या मृतदेहावरील दागिने ओरबाडले
"पोलिसांकडून आम्हाला फक्त मोबाईल मिळाला. फोटोत त्यांच्या हातात दिसणाऱ्या बांगड्या मिळाल्या नाहीत,"
मुंबई : मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं ह्या म्हणीचा प्रत्यय मुंबईत आला. एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मृतांच्या देहावरील सोन्याचे दागिने चोरल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे.
शुक्रवारी एलफिन्स्टन दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कांजुरमार्गच्या रहिवासी सुभलता शेट्टी यांच्या मृतदेहावरुन सोन्याचे दागिने काही नालायकांनी काढून घेतले. नातेवाईकांनी शुभलता यांचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
दुर्घटनेनंतर समोर आलेल्या काही फोटोंमध्ये एक तरुण सुमलता यांच्या हातातील बांगड्या काढून घेताना दिसत आहे. "पोलिसांकडून आम्हाला फक्त मोबाईल मिळाला. फोटोत त्यांच्या हातात दिसणाऱ्या बांगड्या मिळाल्या नाहीत," अशी माहिती शुभलता यांचे शेजारी गणेश शेट्टी यांनी दिली.
यानंतर शेट्टी कुटुंबियांनी हा फोटो रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना मेंशन करुन ट्वीट केला आहे.
एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा मृत्यू झाला तर 39 प्रवासी जखमी झाले. मृतांमध्ये शुभलता यांच्यासह त्यांच्या मैत्रिणीचाही समावेश आहे.
फुलं आणायला गेलेल्या दोन मैत्रिणींचा दुर्दैवी अंत
चेंगराचेंगरीत कांजूरमार्ग येथील दोन मैत्रिणींना आपला जीव गमवावा लागला. कंजूरमार्गच्या मिराशी नगरमध्ये राहणाऱ्या शुभलता शेट्टी आणि नेहरू नगरमध्ये राहणाऱ्या सुजाता शेट्टी या दोघींची चांगली मैत्री होती. दोघी मूळच्या कर्नाटकच्या आहेत. सणाच्या निमित्ताने दोघी फुलांची खरेदी करण्यासाठी एकत्र जात असत.
शुभलता शेट्टी आणि सुजाता शेट्टी दसऱ्याच्या निमित्ताने फुलं आणण्यासाठी एकत्र परेलला गेल्या होत्या. मात्र फुलं खरेदी करुन परतताना एल्फिन्स्टनच्या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि यातच दोघींचाही मृत्यू झाला.
चेंगराचेंगरीत 22 मुंबईकरांचा बळी
मुंबईतील एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी सकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले. सकाळ 9.30 च्या सुमारास फूट ओव्हर ब्रीजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रीज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला.
एलफिन्स्टन- परेल पुलावर नेमकं काय घडलं?
• सकाळी 9.30 च्या सुमारास पावसाची मोठी सर आली.
• त्याचवेळी मध्य रेल्वेवरील परेल आणि पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या.
• त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पादचारी पुलावर गर्दी झाली.
• त्याचवेळी पत्रा कोसळल्याचं सांगण्यात आलं.
• गर्दीच्या वेळी मोठा आवाज झाल्याच्या गैरसमजातून धावपळ सुरु झाली.
• ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली, लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडू लागले
• एकमेकांना तुडवत लोकांची धावपळ सुरु झाली
• सकाळी 9.30 च्या सुमारास थेट जखमी आणि मृतांचा आकडा समोर आला. तिघांचा मृत्यू.
• जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
• काही मिनिटांतच मृतांचा आकडा वाढत गेला
मृतांची नावं
पुरुष
मुकेश मिश्रा
सचिन कदम
मयुरेश हळदणकर
अंकुश जैस्वाल
सुरेश जैस्वाल
ज्योतिबा चव्हाण
रोहित परब
अॅलेक्स कुरिया
हिलोनी देढीया
चंदन गणेश सिंह
मोहम्मद शकील
मसूद आलम
महिला
शुभलता शेट्टी
सुजाता शेट्टी
श्रद्धा वरपे
मीना वरुणकर
तेरेसा फर्नांडिस
पाहा व्हिडीओ
संबंधित बातम्या
चेंगराचेंगरीमुळे महाराष्ट्र दु:खात, दोषींवर कठोर कारवाई करणार : मुख्यमंत्री
एल्फिन्स्टन दुर्घटना : 24 वर्षाच्या हिलोनीचा चेंगराचेंगरीत मृत्यू
एल्फिन्स्टन दुर्घटना : वडिलांशी चुकामूक श्रद्धाच्या जीवावर बेतली
एल्फिन्स्टन दुर्घटना : ऑफिसच्या शेवटच्या दिवशी तेरेसा यांचा मृत्यू
स्टेशनवरील कामं दोन आठवड्यात सुरु करा, पियुष गोयल यांचे आदेश
दसऱ्यासाठी फुलं आणायला गेलेल्या दोन मैत्रिणींचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी अंत
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 61 वर्षीय आलेक्स कोरीयांचा गुदमरुन मृत्यू
एल्फिन्स्टन दुर्घटनेत ज्योतिबा चव्हाण यांचा मृत्यू
कुटुंबाचा एकमेव आधार हरपला, मयुरेशचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी मृत्यू
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : … तर ही दुर्घटना टाळता आली असती!
दहीहंडीला सलामी देणाऱ्या गोविंदाचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी अंत
एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीची घटना अतिशय धक्कादायक : मुख्यमंत्री
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मुंबईतील ही स्टेशन्स मृत्यूचा सापळा!
बुलेट ट्रेनआधी मुंबईच्या लोकलकडे लक्ष द्या!
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 22 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: कोणाला किती मदत?
एल्फिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं?
LIVE : मुंबईत एलफिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी
एल्फिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
शेत-शिवार
राजकारण
क्रीडा
Advertisement