एक्स्प्लोर
पावसामुळे पोल कोसळला, पनवेल, कल्याणच्या वीजपुरवठ्यावर परिणाम
पोल कोसळल्यामुळे पनवेल, कल्याण पूर्व आणि पेणमधील काही गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत पोल उभा करणं शक्य नसल्यामुळे पर्यायी व्यवस्था केली जात आहे.
मुंबई : पावसाचा परिणाम वीज पुरवठ्यावरही झाला आहे. पोल कोसळल्यामुळे पनवेल, कल्याण पूर्व आणि पेणमधील काही गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत पोल उभा करणं शक्य नसल्यामुळे पर्यायी व्यवस्था केली जात आहे.
पनवेल - भांडुप नागरी परिमंडल अंतर्गत येणाऱ्या पनवेल विभागातील 22 केव्ही घोटे फिडरचा पोल पावसामुळे पडला आहे. सद्यस्थितीत तिथे पोल उभा करणं शक्य नाही. या फिडरवर असलेले घोटे, किरवली, तळोजा, तळोजा मजकूर, तेठाली अशा एकूण पाच गाव आणि तेथील जवळपास 4300 ग्राहक प्रभावित आहेत.
महावितरणची टीम फिल्ड कार्यरत असून ग्राहकांना दुसऱ्या बाजूने वीज पुरवठा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. (सायंकाळी 6 वाजेपर्यंत पुरवठा पूर्ववत होणं अपेक्षित होतं)
महाड - भांडुप नागरी परिमंडल अंतर्गत येणाऱ्या पेण सर्कलमधील महाड शहर - नदीचे पाणी शहराच्या सखल भागात आल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे तीन तासांसाठी सुमारे 14 हजार ग्राहक बाधित झाले होते. यापैकी 12 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत झाला आहे. पाणी ओसरेल तसे उर्वरित ग्राहकांचा पुरवठा सुरु करण्यात येईल, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.
पेण शहर - भांडूप नागरी परिमंडल अंतर्गत येणाऱ्या पेण सर्कलमधील पेण शहर - उच्चदाब वाहिनीचा पोल पावसामुळे पडला आहे. यामुळे सुमारे 9000 ग्राहक 3 तासांसाठी प्रभावित आहेत. महावितरणची टीम फिल्ड कार्यरत आहेत. (सायंकाळी 6 वाजेपर्यंत पुरवठा पूर्ववत होणं अपेक्षित होतं)
कल्याण (पूर्व) - कल्याण परिमंडलातील कल्याण पूर्व विभाग - पावसामुळे उच्चदाब वाहिनीचा पोल पडला असून त्यामुळे सुमारे 2000 हजार ग्राहकांचा पुरवठा बाधित झाला आहे. महावितरणचे कर्मचारी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी फिल्डवर कार्यरत आहेत. (सायंकाळी 7 वाजेपर्यंत पुरवठा पूर्ववत होणं अपेक्षित)
दरम्यान, राज्यभरातील महावितरणचे ग्राहक आवश्यकतेनुसार 1912, 18001023435 आणि 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात, असं आवाहन महावितरणने केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement