Eknath Shinde : तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आमची राजकीय चर्चाच झाली नाही; राज ठाकरेंशी चर्चा करताना बाळासाहेबांच्या आठवणीत रमलो; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Eknath Shinde Meet Raj Thackeray : राज ठाकरे हे लोकसभेमध्ये मोदींच्या सोबत होते. त्यांचे विचारही आमच्याशी मिळतेजुळते असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबई : सध्या निवडणुका नसल्याने त्यावर कोणतीही चर्चा करण्याची शक्यता नाही. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आजची भेट ही केवळ आणि केवळ सदिच्छा भेट होती असंही एकनाथ शिंदे म्हणाले. बाळासाहेबांच्या आठवणीने आम्ही पुन्हा जुन्या आठवणीत रमलो असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, "गेल्या काही दिवसांपासून, विधानसभा निवडणूक झाल्यापासून भेटण्याची, गप्पा मारण्याची दोघांचीही इच्छा होती. आज बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे जुन्या गोष्टींवर चर्चा झाली. ही सदिच्छा भेट होती. त्यामुळे राजकीय अर्थ काढण्याची कोणतीही आवश्यकता नाही."
विकासकामांवर चर्चा, पण राजकीय चर्चा नाही
एकनाथ शिंदे म्हणाले की, "मुंबईमधील सिमेंटच्या रस्त्यांची मी पाहणी केली. त्यावर राज ठाकरेंशी चर्चा झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा न होता मुंबईतील विकासकामांवर चर्चा झाली."
घरात बसून निवडणुका जिंकता येत नाहीत
घरात बसून कुणालाही निवडणुका जिंकता येत नाहीत, त्यासाठी काम करणारे लोक हवेत असा टोला यावेळी एकनाथ शिंदे यांनी लगावला. आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी काम करत नाही, तर नेहमीच काम करत असतो असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
माहीम विधानसभा निवडणुकीमध्ये अमित ठाकरेंचा पराभव झाला होता. त्यानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राजकीय दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर आजही भेट ही महत्त्वाची आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर चर्चा?
महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची लढत ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे हे काहीचे वरचढ असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच मतांचं विभाजन टाळण्यासाठी राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी महायुती प्रयत्नशील असल्याचं दिसतंय. राज ठाकरे जर महायुतीसोबत आले तर महायुतीची ताकद निश्चितच वाढणार आहे.
राज ठाकरे सोबत आले तर आनंदच
राज्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले की, "एकनाथ शिंदे जर राज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले तर त्याचे राजकीय अर्थ नक्कीच निघतील याची माहिती आहे. पण राज ठाकरे जर आमच्यासोबत आले तर नक्कीच आम्हाला आनंद होईल. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध हे फार जुने आहेत."
ही बातमी वाचा :























