Maharashtra Political Crisis Eknath Shinde Live : एकनाथ शिंदे कोणता 'बॉम्ब' फोडणार? सात वाजता पत्रकार परिषद घेणार

Maharashtra Political Crisis Eknath Shinde Live : उद्धव ठाकरे कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Jun 2022 07:19 PM
CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जनतेला अभिवादन

CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जनतेला अभिवादन



मातोश्रीवर रात्री 8 वाजता होणार शक्तीप्रदर्शन, सर्व पदाधिका-यांना मातोश्रीवर जमण्याचे आदेश

मातोश्रीवर 8 वाजता होणार शक्तीप्रदर्शन होणार आहे. मुंबईतल्या सर्व विभागताल्या पदाधिका-यांना मातोश्रीवर जमण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

Eknath Shinde : एकनाथ शिंदे कोणता 'बॉम्ब' फोडणार? सात वाजता पत्रकार परिषद घेणार

Eknath Shinde :  महाविकासआघाडी सरकारविरोधात बंडांचं निशाण फडकवणारे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे सात वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका मांडतात? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख सोडायला तयार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख सोडायला तयार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंद आहे. पण समोर येऊन सांगा... मी आव्हानांना तोंड देणारा माणूस आहे. 

आम्हाला मुख्यमंत्री नको, असं तोंडावर सांगावं : उद्धव ठाकरे

काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाले असते की,  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर ठिक आहे. मला दु:ख झाले.  पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं....सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर सांगावं.... तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको,असं तोंडावर सांगावं, असे उद्धव ठाकरे म्हणाले, 

CM Uddhav Thackeray LIVE : ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन बोलले तर मी राजीनामा द्यायला तयार : उद्धव ठाकरे

मला कोणताही मोह नाही, मी राजीनामा द्यायाल तयार आहे. परंतु, ज्यांना मी नकोय त्यांनी माझ्या समोर येऊन बोला. समोर येऊन बोललात तर संध्याकाळी देखील राजीनामा देतो, उद्वध ठाकरे यांनी म्हटले आहे. 

शिवसेना आणि हिंदूत्व एकच, कधीही वेगवेगळे नाही

शिवसेना आणि हिंदूत्व एकच, कधीही वेगवेगळे नाही

CM Uddhav Thackeray LIVE : एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर पाळत ठेवण्यात आली : उद्धव ठाकरे
CM Uddhav Thackeray LIVE : एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर पाळत ठेवण्यात आली होती, ही कसली लोकशाही अशी टीका मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी केली आहे.
CM Uddhav Thackeray LIVE : कोरोना काळात मी प्रामाणिकपणे काम केले :उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray LIVE : प्रशासनाचा अनुभव असलेल्या माणसाच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद आले.पण मी प्रामाणिकपणे काम केलं आहे. 

Uddhav Thackeray : प्रशासनाचा अनुभव नसताना कोरोनासोबत लढलो : उद्धव ठाकरे

प्रशासनाचा अनुभव नसताना कोरोनासोबत लढलो. कोरोना काळात आपण चांगलं काम केलं, असे मुख्यंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

CM Uddhav Thackeray LIVE : कोरोना काळात मी प्रामाणिकपणे काम केले :उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray LIVE : प्रशासनाचा अनुभव असलेल्या माणसाच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद आले.पण मी प्रामाणिकपणे काम केलं आहे. 

थोड्याच वेळात मुख्यमंत्री साधणार संवाद, काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष

थोड्याच वेळात मुख्यमंत्री साधणार संवाद, काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष  





Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे संध्याकाळी सात वाजता पत्रकार परिषद घेणार

उद्धव ठाकरे आता थोड्याच वेळात जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. 

Maharashtra Political Crisis : सायंकाळी सहा  वाजता शरद पवार मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांची भेट घेणार

Maharashtra Political Crisis : सायंकाळी सहा वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांची भेट घेणार आहेत.  

CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 5 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार.

शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. सोबतच सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.



Maharashtra Political Crisis Live : 2021 पर्यंतचे राजकीय गुन्हे मागे घेणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Political Crisis Live : 2021 पर्यंतचे राजकीय गुन्हे मागे घेणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, सरकार बदलल्यास होणारी अडचण टाळण्यासाठी सरकारने ही तजवीज केल्याचं समजतं.

Mahrashtra Political Crisis : मीरा भाईंदरमधील अपक्ष आमदार गीता जैन देखील गुवाहाटीला जाण्याची शक्यता

Mahrashtra Political Crisis : मीरा भाईंदरमधील अपक्ष आमदार गीता जैन या देखील गुवाहाटीला जाऊ शकतात. काही वेळापूर्वीच त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या वेळी गीता जैन यांनी शिवसेनेला समर्थन दिलं होतं.

Eknath Shinde Live Update : संध्याकाळी आमदारांसोबत बैठक, त्यानंतर पुढची भूमिका घेणार : एकनाथ शिंदे

Eknath Shinde Live Update : आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. हिंदुत्त्वाची भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत. संध्याकाळी आमदारांसोबत बैठक होईल. त्या बैठकीनंतर पुढची भूमिका घेतली जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं. आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त संख्याबळ असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. 

कमलनाथ आणि शरद पवार यांच्यातील बैठक संपली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर कमलनाथ बाहेर पडले. त्यांनी म्हटलं की, शरद पवार यांनी आश्वासन दिलं आहे की, "ते महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणारच आणि शिवसेनेचे जे बंडखोर आमदार आहेत त्यांच्याशीही चर्चा केली जाईल." आम्हाला अपेक्षा आहे की हे आमदार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला कलंकित करणार नाहीत.

Maharashtra Political Crisis : गुलाबराव पाटील देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात, गुवाहाटीला रवाना : सूत्र

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुलाबराव पाटील गुवाहाटीला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत  जळगावातील अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे देखील असल्याचं कळतं.

आम्ही जबरदस्ती ठेवलं असतं तर आमचे लोकं त्यांना सोडण्यासाठी गेले असते का? आमदार नितीन देशमुखांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

आम्ही जबरदस्ती ठेवलं असतं तर आमचे लोकं त्यांना सोडण्यासाठी गेले असते का? आमदार नितीन देशमुखांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑनलाईन उपस्थित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑनलाईन उपस्थित आहेत. मंत्रालयात बैठक सुरू झाली आहे

Nanded Updates: नांदेड शहरातील चौकाचौकात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

Nanded Updates: महाराष्ट्रातील शिवसेनेच्या अंतर्गत बंडाळीमुळे उद्धव ठाकरे सरकार डळमळीत झाल्याचे चित्र आहे. तर मंत्री एकनाथ शिंदेच्या नाराज गोटातील 35 आमदारांमध्ये नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर असल्याचे आता निष्पन्न झालंय. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये चिंतेचे व संतापाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या या अंतर्गत बंडाळी विषयी उद्धव ठाकरेंना समर्थन देण्यासाठी नांदेड शहरातील चौकाचौकात उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी बॅनरबाजी केलीय. ज्यात साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा आशयाचे बॅनर सर्व नांदेड शहरात झळकत आहेत.

CM Uddhav Thackeray Corona Positive : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील कोरोना पॉझिटिव्ह, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

CM Uddhav Thackeray Corona Positive : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली.  राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते या बैठकीला व्हर्च्युअली उपस्थित राहाणार आहेत, असं नाना पटोले म्हणाले.

Maharashtra CM Uddhav Thackeray Covid-19 Positive : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.





Maharashtra Political Crisis : दुपारी एक वाजता मंत्रिमंडळाची बैठक, सरकार बरखास्तीबाबत चर्चा होणार नाही : नाना पटोले

Maharashtra Cabinet Meeting : दुपारी एक वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते व्हर्च्युअली उपस्थित राहतील. महाराष्ट्र अस्थिर नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमलनाथ यांच्याशी बोलले. मंत्रिमंडळ बैठकीत सरकार बरखास्तीबाबत चर्चा होणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार पूर्ण ताकदीने चालेल. त्याचं नेतृत्त्व उद्धव ठाकरे करतील, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता, आज संध्याकाळी राजीनामा सादर करु शकतात

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी स्वत: राजीनामा सादर करु शकतात. शिवसेना पक्षप्रमुख पहिल्यांदा आपल्या उरलेल्या आमदार आणि खासदारांची भेट घेऊन त्यांना आपली परिस्थिती सांगणार आहेत. हा मोठा निर्णय घेण्याआधी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा करुन स्थितीची माहिती देणार आहेत. शरद पवार यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचा निर्णय होऊ शकतो. काँग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार सरकार अल्पमतात आलं आहे आणि काँग्रेसला याची जाणीव आहे.

महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने.. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  






Maharashtra Political Crisis : अपक्ष आमदार गीता जैन या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर निवासस्थानी दाखल

Maharashtra Political Crisis : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी अपक्ष आमदार गीता जैन सागर या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. गीता जैन यांच्यासोबत भाजप नेते प्रवीण दरेकर देखील आहेत.

शरद पवार यांच्या घरी सुरु असलेली राष्ट्रवादीची बैठक संपली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीची सुरु असलेली बैठक संपली.





Maharashtra Political Crisis : पुढचे 48 तास संपर्कात राहा, कोणत्याही दौऱ्यावर, परदेश दौऱ्यावर जाऊ नका; भाजपच्या आपल्या सर्व आमदारांना सूचना

Maharashtra Political Crisis : राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप अलर्ट झालं आहे. पुढचे 48 तास संपर्कात राहा. कोणत्याही दौऱ्यावर, परदेश दौऱ्यावर जाऊ नका, कोणत्याही क्षणी मुंबईला यावं लागू शकतं, अशा सूचना भाजप पक्षश्रेष्ठींनी सर्व आमदारांना दिल्या आहेत.

Maharashtra Congress Update : चंद्रकांत हंडोरेंच्या विधानपरिषदेतील पराभवानंतर काँग्रेसमधील काही आमदार नाराज असल्याची माहिती

Maharashtra Congress Update : चंद्रकांत हंडोरेंच्या विधानपरिषदेतील पराभवानंतर काँग्रेसमधील काही आमदार नाराज असल्याची माहिती, काँग्रेसचा दलित चेहरा असलेला नेता काँग्रेसमधीलच काहींच्या क्रॉस वोटींगमुळे हरला- कालच्या काँग्रेसच्या बैठकीत यावर चर्चा झाली. हंडोरेंना पहिल्या पसंतीची ७ मते मिळाली नाहीत, त्यामुळे भाई जगतापांचा फायदा झाला. आजच्या काँग्रेस बैठकीत याविषयावर वरिष्ठ नेते कमलनाथ काय भूमिका घेणार याकडे लक्ष

Maharashtra Politics : भाजपच्या सर्व आमदारांना भाजपा पक्षश्रेष्ठींकडून विशेष सूचना

Maharashtra Politics :  भाजपच्या सर्व आमदारांना भाजपा पक्षश्रेष्ठींकडून विशेष सूचना, पुढचे 48 तास संपर्कात राहा;कोणत्याही दौऱ्यावर आणि परदेशात जाऊ नका कोणत्याही क्षणी तुम्हाला मुंबईत पोहोचायला लागू शकतं, अशा सूचना

थोड्याच वेळात भाजपच्या प्रमुख नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक

गिरीश महाजन  देवेंद्र फडणवीस यांच्या सागरी या निवासस्थानी पोहोचले आहेत, थोड्याच वेळात भाजपच्या प्रमुख नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होईल, सगळ्या राजकीय घडामोडी च्या पार्श्वभूमीवर भाजपा सध्या वेट अँड वॉच च्या भूमिकेत

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा चार्ज कोणत्याही दुसऱ्या राज्यपालांकडे सोपवलेला नाही, राजभवनचं स्पष्टीकरण

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा चार्ज कोणत्याही दुसऱ्या राज्यपालांकडे सोपवलेला नाही, असं स्पष्टीकरण राजभवनकडून देण्यात आलं आहे. भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने गोव्याच्या राज्यपाल श्रीधरण यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार दिला जाण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी म्हटलं होतं. परंतु राजभवनने स्पष्टीकरण देत हे वृत्त फेटाळलं आहे. 

Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे गटाची हॉटेल रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये बैठक सुरु

Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे गटाची हॉटेल रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. हॉटेलबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून इथे पोलीस छावणीचं रुप आलं आहे.

Maharashtra Political Crisis : गोव्याच्या राज्यपालांना महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार दिला जाण्याची शक्यता : सूत्र

Maharashtra Political Crisis : गोव्याच्या राज्यपालांना महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार दिला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून याबाबत माहिती मिळाली आहे. श्रीधरन पिल्लई हे सध्या गोव्याचे राज्यपाल आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोविड झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहेत. त्यातच एकनाश शिंदे यांनी समर्थक आमदारांनी स्वतंत्र गट बनवल्याने महाराष्ट्रात राजकीय संकट ओढावलं आहे. शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा दावा केल्यास ही प्रक्रिया राज्यपालांच्या गैरहजेरीत कोणीताही खोळंबा होऊ नये यासाठी गोव्याच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार दिला जाण्याची शक्यात आहे.

Maharashtra Political Crisis : अजित पवार त्यांच्या आमदारांना जसा तात्काळ निधी उपलब्ध करुन देतात तसं शिवसेनेत होत नाही, म्हणून मी नाराज : आ.डॉ.संजय रायमूलकर

Maharashtra Political Crisis : मेहकरचे शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला असता ते गुवाहाटीमधील हॉटेलात आहेत व आनंदात आहेत, असं सांगितलं. तुम्ही नाराज का आहात, या प्रश्नावर त्यांनी सांगितलं की, "मतदारसंघातील विकासकामांना जसे लोणार सरोवर विकास, पेन टाकळी प्रकल्प यासाठी अनेकदा प्रयत्न करुनही विकासनिधी मिळत नव्हता. ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदारांना तात्काळ विकास निधी उपलब्ध करुन देत असतात तसं शिवसेनेत होत नाही म्हणून मी नाराज होतो. एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन थोडाफार निधी मिळत होता, त्यांच्या मदतीने मतदारसंघात काही काम करु शकलो."

अजित पवार त्यांच्या आमदारांना जसा तात्काळ निधी उपलब्ध करून देतात तसं शिवसेनेत होत नाही , म्हणून मी नाराज : डॉ.संजय रायमूलकर

Maharashtra Political Crisis : मेहकरचे शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर यांचेशी फोनवरून संपर्क साधला असता ते गुवाहाटीमधील हॉटेलात आहेत. आनंदात आहेत असं सांगितलं, तुम्ही नाराज का आहात? याप्रश्नावर त्यांनी सांगितलं की, मतदार संघातील विकास कामांना जसे लोणार सरोवर विकास, पेन टाकळी प्रकल्प यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही विकास निधी मिळत नव्हता, ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदारांना तात्काळ विकास निधी उपलब्ध करून देत असतात, तसं शिवसेनेत होत नाही म्हणून मी नाराज होतो. एकनाथ शिंदेंकडे जाऊन थोडाफार निधी मिळत होता, त्यांच्या मदतीने मतदार संघात काही काम करू शकलो, असं शिवसेना आमदार डॉ.संजय रायमूलकर म्हणाले आहेत. 

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्र ते गुवाहाटी, व्हाया सूरत... राज्याच्या राजकारणावर एबीपी माझाचं खास कव्हरेज

Maharashtra Political Crisis : सूरतहून गुवाहाटीत पोहोचलेल्या एकनाथ शिंदे समर्थक गटाची थोड्याच वेळात बैठक सुरु होणार आहे. 50 आमदारांचा पाठिंबा मिळणार असल्याचा दावा एकनाथ शिंदेंकडून करण्यात येतोय. गुवाहाटीतून प्रत्येक घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचवणार एबीपी माझा हे पहिलं चॅनेल आहे. दुसरीकडे या राजकीय घडामोडी सुरु असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोरोनाची लागण झाल्यानं ते मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. तर तिकडे दुपारी बारा वाजता मविआची बैठक होणार आहे. ज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मध्य प्रदेशातील काँग्रेसचे बडे नेते कमलनाथ असणार आहेत.

Maharashtra Political Crisis : आमची नेतृत्वावर नव्हे तर राष्ट्रवादी-काँग्रेसवर नाराजी : संजय शिरसाट

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंसोबत असलेले औरंगाबादमध्ये शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलीय. काहीवेळापूर्वी त्यांनी थेट गुवाहाटीतल्या रॅडिसन हॉटेलातून माझाला प्रतिक्रिया दिली. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Political Crisis : आमदारांच्या मनांत अनेक वर्षांपासून खदखद, 45 आमदार सोबत : एकनाथ शिंदे

Maharashtra Political Crisis : आमदारांच्या मनांत अनेक वर्षापासून खदखद होती अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिलीय. मी कुणालाही मारहाण केली नाही. सगळे आनंदात आलेत, 45 आमदार बरोबर आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंना जवळपास 50 अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळेल : बच्चू कडू

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंना जवळपास 50 अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय. बच्चू कडू देखील एकनाथ शिंदेंसोबत आसाममधल्या गुवाहाटीतल्या रॅडिसन हॉटेलात आहेत. त्यांनी एबीपी माझाशी बोलताना खूप मोठी प्रतिक्रिया दिली. 

Yogesh Kadam Latest Update : आमदार योगेश कदम देखील गुवाहाटी येथे पोहोचले, सूत्रांची माहिती, योगेश कदम हे रामदास कदम यांचे सुपुत्र

Yogesh Kadam Latest Update : आमदार योगेश कदम देखील गुवाहाटी येथे पोहोचले, सूत्रांची माहिती, योगेश कदम हे रामदास कदम यांचे सुपुत्र

उद्धव ठाकरे यांची शरद पवारांसोबत महत्वाची बैठक, कमलनाथही उपस्थित राहणार

शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांची शरद पवारांसोबत महत्त्वाची बैठक, ठाकरे, पवार आणि काँग्रेसकडून कमलनाथ उपस्थित राहणार,  बैठकीपूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पक्षप्रमुख शरद पवारांच्या भेटीला, शिवसेनेचे बंडखोर आमदार आसाममधील गुवाहाटीत

Bhagat Singh Koshyari covid positive : राज्यपाल कोश्यारी कोरोना पॉझिटिव्ह, रिलायन्स रुग्णालयात दाखल

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु, काल केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, राज्यात नाट्यमय घडामोडी घडत असताना राज्यपाल कोश्यारी रुग्णालयात

Sandipanrao Bhumre: आम्ही शिवसेनेत राहणार, पण वेगळा गट करणार : संदीपान भुमरे

आता आम्ही एकनाथ शिंदे यांचं नेतृ्त्व मान्य केलं आहे. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. शिंदेसाहेबांसह ६ मंत्री आहेत. आम्ही पक्ष बदलणार नाही. शिंदेंसोबत राहणार. बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत. एकनाथ शिंदेंसोबत राहणार. आम्ही शिवसेनेत राहणार, पण वेगळा गट राहणार, असं रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे म्हणाले.

Eknath Shinde Live Updates : रॅडिसन हॉटेलमध्ये शिवसेनेचे 35 आणि अपक्ष 5 आमदार : संजय शिरसाट

Eknath Shinde Live Updates : रॅडिसन हॉटेलमध्ये शिवसेनेचे 35 आणि अपक्ष 5 आमदार आहे. दुपारपर्यंत 46 आमदारांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास. यापैकी 40 आमदार शिवसेनेचे असतील : संजय शिरसाट

Bacchu Kadu First Reaction : 36 आमदार सोबत, त्यापैकी शिवसेनेचे 33 आणि अपक्ष 3, एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल : बच्चू कडू

Bacchu Kadu First Reaction : आता गुवाहाटीमध्ये आहे. आज संध्याकाळपर्यंत समजेल. भाजपचे संजय कुटे आमच्यासोबत आहेत. व्यक्तिगत नाराजी नाही. निधी वाटपात विषमता होती. शिवसेनेच्या आमदारांकडे लक्ष द्यायची गरज होती. मी मुख्यमंत्र्यांना स्वत:हून फोन केला होता. विधानपरिषदेला मतदान केलं होतं. अचानक वातावरण तयार झालं आणि दोन तृतीयांश आमदार फुटल्याने शिवसेनेत आलो. सगळे आमदार स्वखुशीने इथे आले आहेत. 36 आमदार सोबत, त्यापैकी शिवसेनेचे 33 आणि अपक्ष 3, एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल : बच्चू कडूअशी प्रतिक्रिया प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी दिली. 

Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे गटाची सकाळी साडेनऊ वाजता हॉटेल रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये बैठक

Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे गटाची सकाळी साडेनऊ वाजता हॉटेल रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. हॉटेलबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून इथे पोलीस छावणीचं रुप आलं आहे.

Eknath Shinde Live Updates : आमदारांना सुरक्षा देणं हे राज्य सरकारचं काम असतं : सुधीर मुनगंटीवार

Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना आसाम राज्याची सुरक्षा देण्यात आली आहे. आमदारांनी सुरक्षा देण्याची मागणी केली तर त्यांना सुरक्षा देणं गैर नाही. हे राज्य सरकारचं काम असतं, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

Eknath Shinde Live Updates : आपल्यासोबत 40 आमदार, एकनाथ शिंदे यांच्या दाव्यामुळे पक्षांतर बंदी कायद्याच्या कारवाईतून बंडखोर आमदार वाचले

Eknath Shinde Live Updates : आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिंदेंच्या या दाव्यामुळे ते कदाचित पक्षांतर बंदी कायद्यातून वाचू शकतात. 40 आमदारांचं पाठबळ असल्याने अपात्र ठरण्याची टांगती तलवार दूर झाली आहे. त्यांची आमदारकी अबाधित आहे. या 40 आमदारांच्या भूमिकेवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. 

Maharashtra Politics : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर मुंबईत मात्र त्यांचे बंधू एकनाथ शिंदे यांच्याबरोबर

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर मुंबईत मात्र त्यांचे बंधू एकनाथ शिंदे यांच्याबरोबर, 40 आमदारांचा व्हिडीओ समोर आला आहे, त्यामध्ये संजय पाटील-यड्रावकर यांचाही समावेश, मिटिंगसाठी बोलावल्यानंतर  मंत्री यड्रावकर यांनी बंधू संजय पाटील-यड्रावकर यांना पाठवलं होतं

Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांकडून मोबाईल फोन काढून घेतले

Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांकडून मोबाईल फोन काढून घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने संपर्क करु नये, यासाठी खबरदारी म्हणून त्यांचे मोबाईल फोन काढून घेतले आहेत.

Eknath Shinde Live Updates : सर्व बंडखोर आमदार रॅडिसन हॉटेलमध्ये पोहोचले

Eknath Shinde Live Updates : गुवाहाटी विमानतळावरुन सर्व बंडखोर आमदार रॅडिसन हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेलबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे.

Eknath Shinde : शिवसेनेचे 40 आमदार माझ्यासोबत; आमदारांसह गुवाहाटीत दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा दावा

Eknath Shinde and MLA reached Assam Guwahati : राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. कालपासून बंडाच्या पवित्र्यात सूरतमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांना आज भल्या पहाटे सूरतहून एअरलिफ्ट करण्यात आलं. सूरत विमानतळावरून एका चार्टर विमानानं हे सर्व आमदार गुवाहाटीला रवाना झाले होते. मध्यरात्री अडीच वाजता शिवसेना आमदारांना घेऊन एक बस मेरिडियन हॉटेलवरून विमानतळावर दाखल झाली होती. त्यानंतर हे सर्व आमदार विमानानं आसामधील गुवाहाटीत दाखल झाले. 


गुवाहाटी विमानतळावर दाखल होताच एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार असल्याचा पुनरुच्चार केला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, "शिवसेनेचे 40 आमदार माझ्यासोबत आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आणि त्यांची भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत." पुढे बोलताना ते म्हणाले की, मला कोणावरच टीका टिप्पणी करायची नाही. शिवसेनेचे आमदार माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आम्ही सर्वजण पुढे घेऊन जाणार आहोत." तसेच, सध्या 40 आमदार माझ्यासोबत आहेत आणखी 10 आमदार इथे येणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Eknath Shinde : ठाकरे सरकार धोक्यात; एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचा फोटो व्हायरल, स्वतंत्र गट स्थापन होणार!

Eknath Shinde : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आता स्वतंत्र गट स्थापन करण्याची आता दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे. शिंदे यांनी स्वतंत्र गटासाठी आवश्यक असलेली 37 ही संख्या पूर्ण केली असल्याचे सध्या चित्र आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल झाले आहेत. आज भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडणार आहेत.


सूरतमध्ये मंगळवारी दिवसभरानंतर रात्री उशिराही राजकीय घडामोडी घडल्या आहेत. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हेदेखील शिवसेनेच्या आमदारांसोबत आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला आहे. व्हिडिओत आमदार एका निवेदनावर स्वाक्षरी करत असल्याचे दिसत आहे. हे निवेदन विधानसभेत स्वतंत्र गटासाठी मान्यता द्यावी यासाठी होते असल्याचे म्हटले जात आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Eknath Shinde Live Updates : बाळासाहेबांचं हिंदुत्त्व पुढे न्यायचं आहे, माझ्यासोबत 40 आमदार : एकनाथ शिंदे

Eknath Shinde Live Updates : आम्हाला बाळासाहेबांचं हिंदुत्त्व पुढे न्यायचं आहे. माझ्यासोबत 40 आमदार आहेत आणि आमदार आमच्यासोबत येतील, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. 

Sambhaji Raje : एकनाथ शिंदे यांची 'खदखद जुनीच, स्फोट फक्त आता झाला - संभाजीराजे छत्रपती

Sambhaji Raje : एकनाथ शिंदे यांची खदखद ही आताची नसून पूर्वीपासूनच होती, त्याचा स्फोट फक्त आज झाला. असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय. जे चाललंय ते तुम्हीही बघत आहात मीही बघतोय, काय निर्णय येतो बघू. सरकार चांगलं चालावे कुणाचेही असावे आमचं एवढंच मत आहे. असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय. अहमदनगरच्या गुंडेगाव येथे प्रवेशद्वाराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना 40 आमदारांचं समर्थन, एबीपी माझासोबत बोलताना शिंदेंचा दावा

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याला 40 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा केला आहे. एबीपी माझासोबत बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.   

Eknath Shinde :  24 तासात तुमच्यासाठी वाईट झालो का? : एकनाथ शिंदे

Eknath Shinde :  24 तासात तुमच्यासाठी वाईट झालो का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केला. एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा

Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा झाली. मात्र एकनाथ शिंदे आपल्या भूमीकेवर ठाम आहेत. 



Eknath Shinde: एकनाथ शिंदे आणि नार्वेकर यांच्यातील बैठक संपली

एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील बैठक संपली. एकनाथ शिंदे आपल्या 35 समर्थक आमदारांसोबत सुरतमध्ये असून त्यांच्या भेटीसाठी मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक सुरतला गेले आहेत. 


 

Eknath Shinde Live Update : 10 मिनिटांच्या खोळंब्यानंतर शिवसेना नेत्यांचा मेरिडियन हॉटेलमध्ये प्रवेश, एकनाथ शिंदे यांची भेट होणार का?

Eknath Shinde Live Update : शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांना सूरतमधल्या मेरिडियन हॉटेलच्या आत जाण्यास परवानगी मिळाली आहे. 10 मिनिटांच्या खोळंब्यानंतर शिवसेना नेते हॉटेलमध्ये पोहोचले. परंतु एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक होणार की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.

Sharad Pawar :  दिल्लीतली बैठक आटोपून शरद पवार मुंबईच्या दिशेने रवाना

Sharad Pawar :  दिल्लीतली बैठक आटोपून शरद पवार मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. महाराष्ट्रातल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर पवार मुंबईत पोहोचणार आहे. मुंबईत आल्यानंतर आजच रात्री तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक होण्याची शक्यता आहे. 

Eknath Shinde: शिवसेनेचे नार्वेकर आणि फाठक सुरतच्या मेरेडियन हॉटेलमध्ये पोहोचले

शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक हे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी सुरतच्या मेरेडियनमध्ये पोहोचले असून अद्याप त्यांना शिंदे यांच्याकडू भेटीसाठी न ग्रीन सिग्नल मिळाला नाही.

Shivsena : सायंकाळी 7 वाजता वर्षा बंगल्यावर बोलावली पुन्हा बैठक

सायंकाळी  7 वाजता वर्षा बंगल्यावर बोलावली पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे. सर्व आमदार वर्षा बंगल्यावरच आहेत. 
आमदारांसोबत दुपारी पहिली बैठक पार पडली  त्यानंतर पुन्हा वर्षावर  बैठक बोलावण्यात आली आहे

Eknath Shinde Live Update : मिलिंद नार्वेकर आणि रविंद फाटक यांना प्रवेशद्वारावरच अडवलं

Eknath Shinde Live Update : शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक हे सूरतमधल्या मेरिडियन हॉटेलच्या बाहेर पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे यांचा निरोप न आल्यामुळे सध्यातरी त्यांच्या गाड्यांचा ताफा प्रवेशद्वारावरच अडवण्यात आला आहे. दोन्ही नेते गेटजवळ ताटकळत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांची भेट घेण्यासाठी तयार होणार का प्रश्न आहे. 

नवीन गटनेता अजय चौधरी यांना पत्र देण्यासाठी नेते विधान भवनात दाखल होणार

अजित पवार, दिलीप वळसे पाटील अनिल देसाई आणि अरविंद सावंत विधानभवनात थोड्याच वेळात पोहचणार  आहे.  नवीन गटनेता अजय चौधरी यांना पत्र देण्यासाठी नेते विधान भवनात दाखल होणार आहे. 

Eknath Shinde Live Update : मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक सूरतमध्ये दाखल, एकनाथ शिंदे यांच्या भेट घेण्यासाठी मेरिडियन हॉटेलच्या दिशेने रवाना,

Eknath Shinde Live Update : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक हे सूरतमध्ये पोहोचले आहेत. हे दोन्ही नेते थेट मेरिडियन हॉटेलमध्ये न जाता शेजारच्या हॉटेलमध्ये दाखल झाले. तिथे काही मिनिटं थांबल्यानंतर दोघेही मेरिडियन हॉटेलच्या दिशेने रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे हे सध्या मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. परंतु एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची भेट होणार का प्रश्न आहे.

Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे आज संध्याकाळी राजीनामा देण्याची शक्यता : सूत्र

Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे आज संध्याकाळी राजीनामा देण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे संध्याकाळी मंत्रिपदाचा राजीनामा देणार, सूत्रांची माहिती

शिवसेनेविरोधात बंड केलेले एकनाथ शिंदे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. आज संध्याकाळी ते आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. 

Ajit Pawar : संध्याकाळी सहा वाजता अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांची बैठक


एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे. 

Congress MLA not reachable : शिवसेनेपाठापोठ काँग्रेसचे पाच आमदार नॉट रिचेबल : सूत्र

Congress MLA not reachable : काँग्रेसची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. शिवसेनेपाठापोठ काँग्रेसचे पाच आमदार नॉट रिचेबल असल्याची सूत्रांनी दिली आहे. हा पाच आमदार नेमके कोणाच्या संपर्कात आहेत याची माहिती पक्ष नेतृत्त्वालाही नाही.

Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे यांचं बंड उधळून लावण्याचा प्रयत्न, शिंदेंसोबत गेलेल्या सात आमदारांचा उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क

Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे यांचं बंड उधळून लावण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरु आहे. शिंदे यांच्यासोबत गेलेले सात आमदारांचा उद्धव ठाकरे यांच्यासोबत संपर्क झाल्याचं समजतं

Chandrakant Patil Press Conference : समजने वाले को इशारा काफी है, एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटवर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

Chandrakant Patil Press Conference : राज्यसभेला 123 आमदारांनी भाजपला मतदान केले आणि परिषदेला 134 आमदारांनी मदत केली. रात्री एक दोन वाजता तुम्ही हॉटेल बदलता. तुम्हाला तुमच्या आमदारांवर विश्वास नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. तसंच एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिंदे यांना काय म्हणायचे हे मी कसं सांगू? समजने वाले को इशारा काफी है.

Raju Patil : टांगा पलटी घोडे फरार; मनसे आमदार राजू पाटील यांचं खोचक ट्विट 

Raju Patil : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा होती .त्यानंतर ते नॉट रीचेबल असल्याचे समोर आले .शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे काही आमदार देखील नॉट रीचेबल आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे .शिवसेनेचा इतका मोठा गट नाराज असल्याचे आता नवीन राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .या राजकारणावर मनसे आमदार राजू पाटील यानी खोचक ट्विट करत शिवसेनेसह माहविकास आघाडी सरकारला लक्ष केलं आहे .राजू पाटील यांनी टांगा पलटी घोडे फरार ....आनंद सेना ? #Count down # उलटी गिनती # विधानपरिषद निवडणूक #मविआ अस ट्विट केलं आहे .





Eknath Shinde Live Updates : सूरतमधील हॉटेलमध्ये भाजप आमदार संजय कुटे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठकीला सुरुवात

Eknath Shinde Live Updates :  सूरतमधील हॉटेल मेरिडियनमध्ये भाजप आमदार संजय कुटे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठकीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाणार का याची जोरदार चर्चा रंगली आहे

Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरुन हटवलं

Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे यांनी जवळपास 30 आमदारांसोबत बंड केलं. यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई केली आहे. शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरुन हटवण्यात आलं आहे.

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक... एकनाथ शिंदेंची ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया




बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही


Breaking News: शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवला

Aurangabad News: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे 30 पेक्षा अधिक आमदार घेऊन गुजरातच्या एका हॉटेलमध्ये थांबले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या आमदारांमध्ये वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरनारे यांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे पोलिसांनी काही वेळेपूर्वी त्यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस लावला आहे. सकाळपासून घडत असलेल्या घडामोडी पाहता सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी हा बंदोबस्त लावला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन भाजप आमदार संजय कुटे सूरतमध्ये दाखल

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन भाजप आमदार संजय कुटे सूरतमध्ये दाखल झाले आहेत. पोलिसांनी कुटे यांना मेरिडियन हॉटेलच्या प्रवेशद्वारावर अडवलं होतं. मग फोनाफोनीनंतर त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात आला.

Shiv Sena Meeting : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत शिवसेनेचे 18 आमदार उपस्थित, एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष

Shiv Sena Meeting : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या बैठकीत शिवसेनेच्या 55 पैकी 18 आमदाराच वर्षा बंगल्यावरील बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे नेमके किती आमदार आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

Sharad Pawar Press Conference : ...तर आम्ही विरोधी बाकावरही बसू शकतो : शरद पवार

Sharad Pawar Press Conference : शिवसेनेने भूमिका स्पष्ट केल्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. तसंच सरकार पडलं तर काय यावर शरद पवार म्हणाले की, "आम्ही विरोधी बाकावरही बसू शकतो"

Sharad Pawar Press Conference : महाराष्ट्रात यापूर्वीही भाजपकडून असा प्रयत्न, मविआ सरकार बनण्यापूर्वीही अशी बंडाळी : शरद पवार

Sharad Pawar Press Conference : महाराष्ट्रात भाजपने यापूर्वीही असा प्रयत्न केला होता. महाविकास आघाडी सरकार बनण्यापूर्वी देखील अशीच बंडाळी झाली होती. अडीच वर्षे सरकारच योग्य चालत असल्याने हे षडयंत्र, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं.

Maharashtra Political Crises : भाजप सध्या wait and watch च्या भूमिकेत, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
Eknath Shinde : महाविकास आघाडी सरकार संदर्भातील घडामोडींवर भाजप लक्ष ठेवून आहे आणि आम्ही सध्या wait and watch च्या भूमिकेत असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. राज्यातील सरकार अस्थिर होऊन विकासाचे प्रश्न मागे पडत असतील तर त्यासंदर्भात काय करता येईल याबाबत विचारमंथन केले जात असल्याचे ते म्हणाले. आयुष्यभर विरोध केलेल्या काँग्रेसशी शिवसेनेने घरोबा केल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली. शिवसेनेत आलेली अशुद्धता दूर करण्याचा शिंदे यांचा प्रयत्न असेल असं देखील मुनगंटीवार म्हणाले. 

 
Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे यांचं बंड मोडून काढण्यासाठी राज्याचं गृहखात सक्रिय, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दिलीप वळसे पाटील 'वर्षा' बंगल्यावर

Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे यांचं बंड मोडून काढण्यासाठी राज्याचं गृहखात सक्रिय झालं आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. आमदारांना जबरदस्तीने उचलून नेल्याची बाब समोर आल्याने ही कारवाई करण्यात येणार आहे. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने देशमुख यांना जबरदस्तीने घेऊन गेल्याचा दावा करत पोलिसात तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे आता गृहखातं यावर कारवाई करण्याची शक्यता आहे.   

Eknath Shinde Live Update : एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम : सूत्रांची माहिती

Eknath Shinde Live Update : एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन त्यांचे विश्वासू सूरतला रवाना झाले आहेत. परंतु एकनाथ शिंदे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचं मन वळवण्याची सध्यातरी कठीण दिसत आहे.

उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन निकटवर्तीय सूरतला रवाना, एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या मुद्द्यावर चर्चा करणार

एकनाथ शिंदे यांचं बंड थंड करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हस्तक्षेप केला आहे. उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन त्यांचे निकटवर्तीय सूरतकडे रवाना होणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सूरतला जाणार आहेत. 

खासदार हेमंत गोडसे नाशिकहून मुंबईकडे रवाना, वर्षा बंगल्यावर संध्याकाळी शिवसेना खासदारांची बैठक

नाशिकमधून खासदार हेमंत गोडसे मुंबईकडे रवाना झाले आहेत. सायंकाळी शिवसेना खासदारांची वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व शिवसेना खासदारांची संध्याकाळी बैठक बोलावली असल्याची माहिती नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि सेनेच्या काही आमदारांनी बंड केल्यानंतर तातडीने ही बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईतील वर्षा निवासस्थानी बैठक होणार असंल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.

Maharashtra Political Crises : बाळापूरचे आमदार नितिन देशमुख सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल

Maharashtra Political Crises : बाळापूरचे आमदार नितिन देशमुख सूरतमधे एकनाथ शिंदेंसोबत होते. तिथे त्यांना पहाटे छातीत दुखू लागल्याने  पहाटे 4 च्या सुमाराला सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना गंभीर अवस्थेत नवीन सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष कक्ष क्रमांक 15 मध्ये उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. माध्यमांनाही कक्षात जाण्यापासून रोखण्यात आले. 

Maharashtra Political Crises : नाशिक मधून खासदार हेमंत गोडसे मुंबईकडे रवाना, वर्षा बंगल्यावर बैठक

Maharashtra Political Crises : नाशिक मधून खासदार हेमंत गोडसे मुंबईकडे रवाना, सायंकाळी शिवसेना खासदारांची वर्षा बंगल्यावर बैठक


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व शिवसेना खासदारांची संध्याकाळी बैठक बोलावली असल्याची माहिती नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. 


मंत्री एकनाथ शिंदे आणि सेनेच्या काही आमदारांनी बंड केल्यानंतर तातडीने ही बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईतील वर्षा निवासस्थानी बैठक होणार असंल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.

Maharashtra Political Crises : 35 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा, काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा अमान्य असल्याची सूत्रांची माहिती

Maharashtra Political Crises : राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे. भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. आम्ही शिवसैनिक आहोत आणि अजूनही शिवसेनेसोबतच आहोत, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. 

Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे नॉट रिचेबल, ठाण्यातील निष्ठावंतांना 'वर्षा'वरुन फोन, 'वर्षा'वर येण्याचे आदेश

Shiv Sena MLA Meeting : हॉटेल सेंट रेजीसमधून 14 शिवसेना आमदार वर्षा बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक होणार आहे. ठाण्यातील निष्ठावंत शिवसेना पदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावरुन मध्यरात्री २ ते ३ वाजता फोन करुन बैठकीसाठी बोलावलं आहे

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात नाराजीनाट्य, दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; अमित शाह जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी पोहोचले

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात नाराजीनाट्य घडलेलं असताना दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी गृहमंत्री अमित शाह दाखल झाले आहेत. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत असल्याने ते देखील नड्डा यांच्या निवासस्थानी पोहोचतील अशी शक्यता आहे.

Shiv Sena MLA Meeting : वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक, आमदार येण्यास सुरुवात

Shiv Sena MLA Meeting : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला आमदार येण्यास सुरुवात झाली आहे. अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत वर्षावर दाखल झाले आहेत.

Shivsena Leader Eknath Shinde : एकनाथ शिंदेंसोबत कोण? एबीपी माझाच्या हाती यादी, जाणून घ्या

Shivsena Leader Eknath Shinde : विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे तब्बल 35 आमदारांसह सूरतमध्ये असल्याचं बोललं जात आहे. एबीपी माझाच्या हाती त्यापैकी काही आमदारांची नावं लागली आहे. 


मराठवाडा 


1. सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार.
2. पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
3. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
4. कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
5. वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
6. नांदेडचे बालाजी कल्याणकर


कोकण 
1. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी
2. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे
3. महाडचे आमदार भरतशेठ गोगावले


पश्चिम महाराष्ट्र 
1. आटपाडीचे आमदार अनिल बाबर
2. भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर
3. पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
4. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
5. साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे


ठाणे  
1. अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर
2. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा
3. भिवंडी ग्रामिणचे आमदार शांताराम मोरे
4. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर


उत्तर महाराष्ट्र  
1. पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील


विदर्भ 
1. मेहकरचे आमदार संजय रायमुलकर
2. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड

Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याचा दावा

Eknath Shinde Live Updates : शिवसेनेमधील आतापर्यंतच सर्वात मोठं बंड झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याचा दावा केला जात आहे.

Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी तयार; सूत्रांची माहिती

Eknath Shinde Live Updates : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी तयार झाले आहेत. शिवसेनाच्या वरिष्ठ नेत्यांना सूरतमध्ये भेटण्यास एकनाथ शिंदे तयार झाले आहे. 

Eknath Shinde Live Updates : काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतचं सरकार मान्य नाही, बंड करणाऱ्या आमदारांची भूमिका

Eknath Shinde Live Updates : काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतचं सरकार मान्य नाही, आम्ही शिवसैनिक आहोत, भाजपसोबत गेल्यास आम्ही शिवसेनेसोबत, बंड करणाऱ्या आमदारांची भूमिका

Maharashtra Political Crises : राजकीय घडामोडींना वेग; राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार थेट मुंबईला येणार

Maharashtra Political Crises : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुण्याला यशस्वीनी सन्मान सोहळा या कार्यक्रमासाठी संध्याकाळी जाणार होते. मात्र सध्या राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींमुळे ते कार्यक्रमाला न जाता थेट मुंबईला येणार आहेत. 

Shivsena Leader Eknath Shinde : नॉट रिचेबल आमदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी मिलिंद नार्वेकरांवर

Shivsena Leader Eknath Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर सध्या सर्व नॉट रिचेबल आमदारांना फोन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 


 

Shivsena Leader Eknath Shinde : ...नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता, एकनाथ शिंदे यांना उद्देशून नारायण राणेंचं ट्वीट

 


 





कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क, दुपारी वर्षा बंगल्यावर होणाऱ्या बैठकीला हजेरी लावणार

Maharashtra Political Crisis : कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क, दुपारी वर्षा बंगल्यावर होणाऱ्या बैठकीला हजेरी लावणार, दादा भुसे यांची एबीपी माझाला माहिती 

एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर अपक्षांमध्ये पांगापांग? कार्यकर्त्यांशी बोलून पुढची भूमिका ठरवणार : गीता जैन

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर अपक्षांमध्ये पांगापांग पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांशी बोलून पुढची भूमिका ठरवणार असं मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Maharashtra Political Crisis : राज्याचे कृषीमंत्री दादा भूसे देखील नॉट रिचेबल

Maharashtra Political Crisis : राज्याचे कृषीमंत्री दादा भूसे देखील नॉट रिचेबल आहेत. दादा भुसे एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत का, अशीही चर्चा सुरु आहे

काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश

Maharashtra Political Crisis : काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी हे आदेश दिले आहेत. मुंबईत असलेले आमदारांना दुपारी १२ वाजेपर्यंत रिपोर्ट करण्यास सांगितलं आहे तर मुंबईबाहेर आपापल्या मतदारसंघात पोहोचलेल्या आमदारांना दुपारी ४ वाजता दाखल होण्यास सांगितलं आहे. 

एकनाथ शिंदेंसह काही आमदारांसोबत संपर्क, गैरसमजातून काहींना बाहेर नेण्याचा प्रयत्न : संजय राऊत

Sanjay Raut Press Conference : काही आमदार मुंबईत नाहीत. एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांसोबत संपर्क झाला आहे. काही आमदारांना गैरसमजातून बाहेर नेण्यात आलं. राजकीय भूकंप होईल यात आम्हाला तथ्य वाटत नाही. मध्य प्रदेश पॅटर्न राबवून महाराष्ट्रात ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदे हे आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत. ते कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 

आमदारांची नाराजी अल्पकाळाची : नाना पटोले

Nana Patole Press Conference : "भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे. भाजपच्या राजकारणाचा नवा अध्याय आहे. शिवसेना आमदारांची नाराजी ही अल्पकाळाची आहे. ऊन सावलीचा खेळ आहे. महाराष्ट्रावर आलेलं ऊन हे सावलीत रुपांतरीत होईल. मी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना बैठकीसाठी बोलावलं आहे. त्यानंतर भूमिका घेतली जाईल. विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या बंडखोरीचं आत्मचिंतन केलं जाईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंची दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद तर संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकरांकडून शिवसेना आमदारांना फोन

Eknath Shinde Live Updates : नाराज एकनाथ शिंदे दुपारी आज 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर अनेक शिवसेना आमदारांना फोन करत आहेत.

Maharashtra News Live : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत

Devendra Fadnavis at Delhi : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीत पोहोचले आहेत. फडणवीस आज सकाळीत दिल्लीत दाखल झाल्याची माहिती 

Eknath Shinde : शिवसेना आमदारच नव्हे तर मंत्रीही नॉट रिचेबल; एकनाथ शिंदे यांच्यासह चार मंत्री सूरतमध्ये असल्याची माहिती

Eknath Shinde Live: शिवसेना आमदारांसह मंत्रीही नॉट रिचेबल; एकनाथ शिंदे यांच्यासह शंभुराजे देसाई, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, संदिपान भुमरे हे मंत्री सूरतमध्ये असल्याची माहिती

Eknath Shinde: मुक्ताई नगरचे शिवसेना समर्थित आमदार चंद्रकांत पाटील हे मुंबईमध्येच असल्याची माहिती. माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता

Eknath Shinde:   मुक्ताई नगरचे  शिवसेना समर्थित आमदार चंद्रकांत पाटील हे मुंबईमध्येच असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. आमदार चंद्रकांत पाटील हे माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. 

Eknath Shinde: मुक्ताई नगरचे शिवसेना समर्थित आमदार चंद्रकांत पाटील हे मुंबईमध्येच असल्याची माहिती. माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता

Eknath Shinde:   मुक्ताई नगरचे  शिवसेना समर्थित आमदार चंद्रकांत पाटील हे मुंबईमध्येच असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. आमदार चंद्रकांत पाटील हे माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 25 आमदार सूरतमधील हॉटेलमध्ये असल्याची माहिती

Shivsena Eknath Shinde: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 25 आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शिवसेनेचे 20 आमदार असून इतर अपक्ष आमदार असल्याची माहिती आहे. 

सूरतमधील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत 25 आमदार : सूत्र

गुजरातच्या सूरतमधील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 25 आमदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोकणातील आमदार मुंबईला रवाना

कोकणातील आमदार मुंबईला रवाना झाले आहेत. उदय सामंत, वैभव नाईक, दीपक केसरकर, योगेश कदम मुंबईला येण्यासाठी रवाना झाले आहेत. तर राजन साळवी मुंबईत आहेत

बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा मोबाईल फोन बंद

अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा मोबाईल फोन बंद आहे. परंतु, टोन मराठीतच येत आहे. त्यामुळे ते मुंबईतच असल्याचं त्यांचे समर्थक सांगत आहेत.

एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा फोन रात्रीपासून बंद

सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील हे देखील एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असून काल रात्रीपासून त्यांचा फोन बंद आहे. जवळच्या सहकाऱ्यांना देखील आमदार शहाजीबापू पाटील कुठे आहेत हे माहित नाही. ते मुंबई मध्ये असावेत असे कार्यकर्ते सांगत आहेत.

नांदेड उत्तर मतदारसंघाचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांचा फोन नंबर बंद

नांदेड उत्तर मतदारसंघाचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांचाही नंबर आणि त्यांच्या सर्व पीएचे नंबर बंद आहेत.

बुलढाण्यातील शिवसेनेच्या दोन आमदारांचे फोन नॉट रिचेबल, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड दोघेही नॉट रिचेबल

बुलढाण्यातील शिवसेनेच्या दोन आमदारांचे फोन नॉट रिचेबल, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड दोघेही नॉट रिचेबल, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर यांच्या व्हॉट्सअॅपच्या डीपीवर मंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो

उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली, मात्र आमदार भास्कर जाधव मुंबईतून कोकणात परतले

Ratnagiri News : विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. विधानपरिषद निवडणुकीत अंतर्गत गटबाजी आणि नाराजीतून शिवसेनेची मतं फुटली, अशी चर्चा सध्या सुरु आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली असताना कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे आज मुंबईतून घरी परतले आहेत. गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव हे रात्रीच घरी परतले आहेत. मंत्रिपदातून डावलल्याने भास्कर जाधव शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा आहे. 

शिवसेनेतल्या घडामोडींचं गांभीर्य वाढल्याचे मोठे संकेत, संजय राऊत यांचा दिल्ली दौरा रद्द

शिवसेनेतल्या घडामोडींचं गांभीर्य वाढल्याचे मोठे संकेत, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द, राष्ट्रपती निवडणुकीसाठी शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीसाठी आज संजय राऊत दिल्लीत हजर राहणार होते, पण एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यामुळे संजय राऊत दिल्ली ऐवजी आता मुंबईतच थांबणार

Eknath Shinde : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ; नॉट रिचेबल एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती

Shivsena Leader Eknath Shinde : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी 



 

Congress : 'महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल'; काँग्रेस नेत्याच्या मोठ्या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे

Vidhan Parishad Election 2022 : 'महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल'; काँग्रेस नेत्याच्या मोठ्या वक्तव्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी 



 

Narayan Rane On Shivsena : शिवसेना नेते एकनाथ शिंदे नॉटरिचेबल; नारायण राणे यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

Narayan Rane On Shivsena : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी



 

Shivsena : शिवसेना फुटण्याची शक्यता? मंत्री एकनाथ शिंदे समर्थक 13 आमदार नॉटरिचेबल

Shivsena : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यातील वाद आता टोकाला पोहचला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांचे समर्थक मानले जाणारे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी 



 

पार्श्वभूमी

Maharashtra Political Crisis Eknath Shinde Live : राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापत असल्याचं चित्र असून वेगवान घडामोडी घडत आहेत. सोमवारी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटली. त्यामुळे सेनेत फूट पडण्याची परिस्थिती निर्माण झाली. आणि याच परिस्थितीत सेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी बंडाचं हत्यार उपसलं. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना केवळ 35 आमदारांचाच नाही, तर 40 आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत ते काल म्हणाले, भाजपसोबत जावं हीच पक्ष हिताची भूमिका आहे. मला तुमच्याकडून आश्वासन हवं आहे. मला मंत्रिपद नाही  दिलं तरी चालेल. पण भाजपसोबत सरकार बनवा. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणार नाही असं वक्तव्य केल्यामुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काय म्हणाले एकनाथ शिंदे?


आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाहीएकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेच्या माझ्यासोबतच्या आमदारांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे त्यांनी हिंदुत्वाची जी शिकवण दिली त्यावर आम्ही पुढे जात आहोत. सत्तेसाठी असो किंवा मग राजकारणासाठी असो हिंदुत्वाचे बाळासाहेबांचा आहे ते कडवट हिंदुत्व ही भूमिका ही भूमिका आम्ही सर्व जण पुढे घेऊन जातोय. आम्ही सगळे बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडली नाही आम्ही शिवसेना सोडणार नाही. बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढच्या राजकारण समाजकारण करणार आहोत. बाळासाहेबांनी या देशाला हिंदुत्वाचा विचार दिला आहे त्यामध्ये कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही आणि हाच विचार पुढे घेऊन जातोय.


उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे फोनवरुन चर्चा


मिलिंद नार्वेकर आणि संदीप फाटक यांची एकनाथ शिंदे यांची भेट झाली. उभय नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी शिंदे यांनी महाविकास आघाडीमध्ये राहू नये, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,  तुमचं काही नाही,माझं काही नाही तर जायचं कशाला? उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पुन्हा एकदा शिवसेना आमदारांची आणि नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदार - खासदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदेशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव दिला असला तरी त्यावर तुर्तस कोणतीही चर्चा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह स्थापन केलेली महाविकास आघाडी  कायम राहणार असल्याचे सूतोवाच उद्धव ठाकरेंनी या बैठकीत केले आहे. 


शिवसैनिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया, महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य धोक्यात?


एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसैनिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. मुंबईत शिवसेना भवनाबाहेर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक एकत्र आले होते. शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडखोरीविरोधात महिला शिवसैनिकांचा आक्रोशही पाहायला मिळाला. त्यावेळी एका महिला शिवसैनिकाला अश्रू अनावर झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे आता महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य धोक्यात आल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या एका गटाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याचं पटलं नसल्याचंही स्पष्ट होतंय. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या धरतीवर शिवसेनेला काँग्रेसची सोबत परवडणार नसल्याचं अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं असल्याची माहिती आहे.


भाजपा बहुमताचा 145 चा आकडा गाठू शकते.


विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतांची जुळवाजुळव केली ती पाहता एकनाथ शिंदे यांच्या दाव्यानुसार जर  40 शिवसेना आमदार  असतील तर सत्तेची गणित बसवणं भाजपासाठी कठीण जाणार नाही असं चित्र दिसत आहे. भाजपाचे  106 आमदार, एकनाथ शिंदेंना समर्थन करणारे 40 आणि अपक्ष अशी मोट बांधून भाजपा बहुमताचा 145 चा आकडा गाठू शकते.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.